बहीण पाहिजे, आत्या पाहिजे, माता पाहिजे तर मुलगी का नको?-डॉ. माया जाधव

औढा ना. (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद प्रशालेत 18 फेब्रुवारी दुपारी 2 वा,. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. किशोरी उत्कर्ष मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनाथ संस्थापक विश्वस्त शरयू देव ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माया जाधव (वै.अ.औढा ना.) नेहरु युवा केंद्राचे अध्यक्ष श्रीमती चंदा रावळकर, तसेच जयश्री आठवले, श्रीमती मातेकर, माया मुळे (शालेय व्यवस्थापन समिती) आदी उपस्थित होत्या. डॉ. माया जाधव यांचे किशोरींना उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. किशोरींना मार्गदर्शन करताना त्रीचे आरोग्य, आहार, त्रीभूणहत्या थांबवा असे आवाहन केले. बहीण पाहिजे, आजी पाहिजे, माता पाहिजे तर मुलगी का नको ? मुलगी मुलगा समानता हा भेदभाव थांबवा अन्यथा द्रोपदी व्हायला वेळ लागणार नाही. त्री पुरुष समानता ठेवा, अन्यथा निसर्गाचा समतोल बिघडेल. असे कळकळीचे आवाहन त्यांनी उपस्थित मातांना केले. मुलींच्या जन्मदर वाढावा म्हणून दोन मुलीवर शत्रक्रिया केलेल्या मातांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्चना रामनगीरे यांनी केले तर आभार नुरसत सुलताना यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, एस.एस. पांडे, शिवाजी मोरे, अनिल देशमुख, सौ. सधु मॅडम, सौ. सोनाली राठोड व शाळेतील शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थीनी व त्यांच्या माता मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.