उमरी (प्रतिनिधी): येथील शिक्षक बाबुराव धुपा जाधव हे गेली 25 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सेवा करत आहे हे शिक्षण सेवेचे काम करत बी.डी. जाधव सरांनी वृक्षारोपन, साधन, व्यक्ती कुटुंब कल्याण अल्पबचत विद्यार्थी, स्काऊंट असे अनेक उपक्रमात सहभाग घेवून ग्रामीण विद्यार्थ्यांना जागृत करण्याचे काम सतत बी.डी. जाधव सर करत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेवून बी.डी. जाधव सरांना 2011-12 चा जिल्हास्तरीय आदर्श गुरु गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला. ह्या पुरस्काराचे वितरण 24 ऑगस्ट रोजी मुखेड येथे पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते व आ. विक्रम काळे, आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, शिक्षण सभापती संजय पाटील कर्हाळे, मा. अभिमन्यु काळे, कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जि.प. उपाध्यक्ष प्रकाश राठोड, गोविंद राठोड आयुक्त मुंबई, धरमसिंग चव्हाण, रोहिदास जाधव, बंडू नाईक, सुशांत राठोड, शिवराम जाधव, वसंतराव जाधव, साई राठोड, प्रकाश चव्हाण, बळीराम राठोड, अरविंद राठोड, शिवाजी राठोड, प्रल्हाद राठोड, आर.सी. आडे, जिदेवाड, कपाटे, मठपती, पांडागळे, शेळके, कांबळे आदींनी अभिनंदन केले आहे.