दिनांक 1-1-18 नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलांना ट्युशनला सोडण्यासाठी गेले होते.मोदी पोलिस चौकीच्या बाजूला DRM ऑफिसच्या लगत एक 55-60 वर्षाचे वृद्ध आजोबा तेथे दिसून आले.त्यांच्याशी मी संवाद साधला तर ‘1995 साली बायको वारल्यानंतर घर सोडून बाहेर पडले आहेत.मुलं बाळ बघत नाही तर घरात राहून काय उपयोग’, त्या आजोबांचे आहे.त्या फुटपाथवरिल आजोबाला आधार देण्यासाठी मी माझे बंधू राजूभाऊ पवार यांना फोन केला.ते येऊ शकले नाही पण संजयभाऊ चव्हाण व त्यांचे सहकारी यांना मदतीसाठी पाठविले.तसेच प्रार्थना फाऊंडेशन चे प्रसाद मोहिते सरांना फोन केला.सर आज कामांमधे असल्यामुळे येऊ शकले नाही.पण सगळ्यांना मदतीसाठी आव्हान केले.तसेच बोरामणीचे प्रकाश चव्हाण आणि बोरामणीचे सरपंच राजू भाऊ राठोड हे देखील प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहचले.वसीम शेख सरांना मी फोन करून मतद मागितली.या सगळ्यांच्या मदतीने आज आजोबाला आम्ही आधार देवू शकलो.आम्ही सोलापूर महानगरपालिका नागरी समुदाय विकास प्रकल्प(USD)दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत बेघरांना निवारा दिला जातो.तेथे त्या वृद्ध आजोबाला घेऊन गेलो.नविन वर्षाच्या सुरवातीला पुन्हा एक नवा संकल्प कला की,फुटपाथवरिल बेघराला आधार देण्याचा प्रयत्न करावा.
ही पोस्ट प्रसिद्धी साठी नाही आहे.तर ही पोस्ट टाकण्या मागचा एकच उद्देश आहे की तुम्ही पण मदतीला पुढे यावे.
नव्या वर्षी एक नवा संकल्प जगूया माणूसकीसाठी
माणूसकीचा हात पुढे करूया…
सगळ्यांचे धन्यवाद…!
सौ अश्विनी रविंद्र राठोड
प्रमुख प्रतिनीधी: रविराज एस. पवार
8976305533