भटके विमुक्त आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मॅट न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात प्रचंड असंतोष

Haribhau Rathod, Ex MP

मुंबई (प्रतिनिधी) – मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाची योग्य अं लबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी केलेला कायदा रद्द करून अवैद्य ठरविताना मॅट न्यायालयाने आरक्षण धोरणालाच हात घालून पदोन्नती व भरती मधील संपूर्ण आरक्षणरद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून भटक्या विमुक्त व संपुर्ण मागासवर्गीय आरक्षण थांबवण्याचे कटकारस्थान चालू आहे काय ? अशी शंका आणि भीती मागासवर्गीयांध्ये निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे प्रचंड गोंधळ उडाला असून गेल्या 10 वर्षा ध्ये ज्यांना पदोन्नती मिळाली होती. त्यांनाही मूळ पदावर जावे लागेल आणि भविष्यामध्ये याघटकाचे पदोन्नती व आरक्षण बंद करण्यात येऊन हजारो वष ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर परत अन्यायाची टांगती तलवार या निर्णयामुळे उभी राहिली आहे. या निर्णयाच्या विरोधात येत्या 10 तारखेला भटक्या विमुक्त आणि विविध मागासवर्गीय संघटनांनी मिळुन नागपूर मध्ये विधान भवनावर मोर्चा आयोजन केले आहे. मागासवर्गीय होऊ घातलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदार व आमदार तसेच भटक्या विमुक्तांचे नेते श्री.हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.