वाशिम (प्रतिनिधी) – भटक्या विमुक्त हा आपल्या आस्तित्वाची लढाई लढत असुन तेच या देशाचे मुलनिवासी असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध असुन भटक्या विमुक्ताच्या न्यायालयीन लढा आरक्षणासाठी तिव्र करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण यांनी केले ते वाशिम येथील जिजाऊ सभागृहात बंजारा समाजाच्या न्यायालयीन लढा या विषयावर आयोजीत व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव होते तर विचार पिठावर भारतीय बंजारा समाज कर्मच्यारी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोविंद भाऊ राठोड (आयुक्त ठाणे) अमरसिंग चव्हाण, प्रदेश सरचिटणीस, बळीभाऊ राठोड माजी उपाध्यक्ष, अशोक राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जि.प. माजी सभापती सुभाष राठोड, जि.प. सदस्य शालीक राठोड, जि.प. सदस्य राजेश जाधव संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास राठोड, वाशिम जिल्हा अध्यक्ष खुशाल राठोड आदी उपस्थित होते. या वेळी बोलातंना प्रा. चव्हाण म्हणाले की 1871 मध्ये इंग्रज राजवटीतच भटक्या विमुक्तांना गुन्हेगारी जमातीच्या कायद्याने बंदिस्त करण्यात आले. 1881 मध्ये वनकायद्याद्वारे भटक्या विमुक्तांचे मुक्त पंख छाटण्यात आले या वेळी भटक्या विमुक्तच्या निरक्षेतेचा फायदा येथील राज्यव्यवस्थेने घेवुन त्यांना मानसिक गुलामगीरीत बांधुन ठेवले भारताच्या स्वातंत्रप्राप्तीनंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी तत्कालीन पंतप्रधान नेहरुनी सोलापुरच्या अधिवेशनात भटक्याना विमुक्त घोषीत केले व त्यानंतर 1965 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र आरक्षण लागु केले त्यानंतर थाडे आयोग, बापट आयोग, कालेलकर आयोग, राज्य मागास्वर्गीय आयोग, मंडल आयोग, रेणके आयोग, भटक्या विमुक्ताच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आले सर्वच आयोगानी बंजारा समाज हा आदीम जमातीच्या आराखडय़ात बसत असल्याचा निर्वाळा देवुनही त्यांना त्यांच्या आरक्षणा पासुन वंचीत ठेवण्यात आले. या सर्व आयोगाच्या शिफारशीची कागद पत्रे सोबत घेवुन 19 जानेवारी 2011 रोजी मी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या वतीने याचीका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली या याचीकेवर आतापर्यंत बर्याच वेळा सुनावण्या झाल्या तरी सुध्दा भटक्या विमुक्तांना न्याय मिळालेला नसुन विमुक्त भटक्यांनी आता न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे अहवान करुन वेळ प्रसंगी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही हे प्रकरण आपण घेवुन जाऊ असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक टि.व्ही. राठोडणे केले सुत्र संचालन सुधाकर राठोडने तर प्रा. आर.डी. चव्हाण ने आभार मानले. या कार्यक्रमाला संपुर्ण महाराष्ट्रातुन असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हासचिव प्रा. रतन राठोड कार्यध्यक्ष शाम राठोड, आकाराम चव्हाण, शालीग्राम पवार, प्रकाश राठोड, प्रा. जय चव्हाण, प्रा. जे.डी. जाधव, प्राचार्य व्ही.डी. राठोड, श्रावण जाधव, शेरा राठोड, नीचंद चव्हाण, करण पवार आदिनी परिश्रम घेतले.
श्रोत : बंजारा पुकार