अकोला (प्रतिनिधी) – अकोला येथे भटके विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे सदस्य मा. श्रावणभाऊ राठोड (इंदौर) यांना भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन श्री विलास राठोड (सामाजिक कार्यकर्ता) व माजी सभापती अजावराव जाधव, शालीक पवार, श्याम राठोड, आकाराम चव्हाण व असंख्य बंजारा बांधव भगीनीच्या उपस्थीतीत दिले. भटकया विमुक्तांचे स्वातंत्र्य पूर्ण काळात व स्वातंत्र्यांच्या 67 वर्षात शासनाने फक्त थट्टा उडविण्याचेच काम केले आहे. देशात 15 कोटीच्या वर असलेल्या भटके विमुक्तांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचीत ठेवले आहे. अनेक आयोगाच्या शिफारशी मागविण्यात आल्या त्यावर कोणत्याच प्रकारची उपाय योजना करण्यात आली नाही. भाजप सरकारने बंजारा समाजाला राष्ट्रीय आयोगावर मध्यप्रदेशच्या श्रावणभाऊ राठोड यांना प्रतिनिधीत्व देऊन बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. परंतु शासनाने आमच्या न्याय हक्काकडे दूर्लक्ष करु नये. स्वातंत्र्यापासुन आमच्या प्रलंबीत व रास्त मागण्या सामाजीक न्याय मंत्रालयानी मान्य कराव्या व भटक्या विमुक्तांना विकासाच्या प्रवाहात आणावे. अश्या आशयाचे निवेदन डी.टी.एनटी राष्ट्रीय आयोगाकडे मा. श्रावणभाऊ राठोड यांच्या माध्यमाने केल्या आहे.