भटक्या विमुक्त स्त्रियांस माणूस म्हणून
कधी स्थान मिळेल?
भटक्या विमुक्त समाजातिल स्त्रियांना संघटित करून, प्रबोधन करून मुख्य प्रवाहात आणावे लागणार आहेत. भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. ही वास्तिवकता आहे या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ व् क्लेश दायक वाटते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक पातळीवर या स्त्रियांचे प्रश्न कधीच चर्चेत येते नाही, याची खंत वाटते भटक्या-विमुक्त जमातींमधील स्त्रियांना आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर बुद्धिजीवी पुरुष वर्गाना पुढे येउन सुविचार केले पाहिजेे. भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांच्या वाटय़ाला येणारं नरकप्राय जिणं स्थिर समाजाला अद्याप अपरिचित आहे.सविधानात बहाल करण्यात आलेले हकक व् अधिकार या बाबतित कोणताही गंध याना नाही तसेच सामाजिक, राजकीय, स्त्रीमुक्तीच्या चळवळी, महिलांचे आरक्षण या स्त्रियांच्या हक्काविषयी कसलीही गंधवार्ता या समाजात दिसून येत नाही. त्यांच्यामध्ये नैक्तिक अधिकाराची जाणीव व्हावी, असा प्रयत्न ही होताना दिसत नाही. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा,व्रत वैकल्य या दारिद्रय़ाच्या गर्तेत अडकलेल्या या जमातीतील स्त्रियांना माणूस म्हणून स्थान कधी मिळेल, असा प्रश्न.
सर्व बुद्धिजीवी,समाजसेवक,संघटना,राजकीय नेते, चळवळीत काम करणारे गोर बांधव याना आहे,आत्मपरीक्षण होणे आवश्यक वाटते
सदर लेख व्यक्तिक नाही वस्तुस्थिति स्वीकारा असा आग्रह ही नाही
——––—सुखी चव्हाण,बदलापुर
– गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com
मो.9819973477