“भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान”

🙏 *अत्यत महत्त्वाचे*🙏
माझ्या सर्व  गोर बंजारा बांधवांना
*जय सेवालाल जय वसंत*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान*
     मित्रांनो , बंजारा आदीम जमातीपैकी एक, काळाच्या ओघात आपल्यात अनेक स्तिथंत्यरे घडलीत . विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुध्दा अमलात आणल्या गेले.मात्र  भारतीय लोकशाही प्रणालीचा अंगीकार व त्यान्वये मुलभूत हक्क व अधिकार बाबतचे समान भागीदारी पासुन आम्ही कोसो दूर असल्याचे आजचे चित्र आहे,आमची सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,राजकीय व सांस्कृतिक समस्यांना न्याय पाहिजे तसा मिळाले नाही,वा मिळत नाही आहे.कारण आमची सत्तेतील भागीदारी तोडकी व अत्यल्प आहे. यामागची अनेक कारणे आहेत.सर्वच स्तरावर आमचा समान विकास संविधानाला अनूलक्षुन व्हावा असे आपण प्रतेकास वाटने सहाजिक आहे.त्यासाठी समाजविकासाला अभिप्रेत असणाऱ्या आपण सर्वामध्ये संवीधानाप्रती जागृक राहून त्याचे वाचन करने गरजेनुसार आवश्यक आहे.जेव्हा  आपण संविधानातील तत्वाचा प्रत्यक्ष अमल करू तेव्हाच आपणास विकासाच्या दिशा कळायला लागेल. हे सर्व काही पुस्तकात आहे.पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचन अशक्य असेच आहै.पण whaetsapp च्या माध्यामाने आपण सहजतेने भारतीय संविधान भाग व घटकानुसार वाचु शकता.त्यासाठी हा संवीधान वाचन उपक्रम क्रमाने मांडण्यात येत आहे.आजपासुन त्याचे क्रमिक वाचन करून ज्ञान अवगत करावे व इतरांनाही त्याची जाणीव जागृती करावी अशा अपेक्षेसह या लेखनाचे प्रायोजन ……
*संकलन –*
*प्रा दिनेश सेवा राठोड*
*क्रमशः*

~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com

image