*जय सेवालाल जय वसंत*
????????????????????????
*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम ***
______________________________
*भारतीय संविधान वाचन व जनजागृती अभियान*
???? *भाग 2*????????
*आजही २६ जानेवारी* हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
*घटना समितीच्या बैठका*
घटना समितीच्या एकूण ११ बठका झाल्या. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीची शेवटची बठक झाली. सर्व सभासदांनी त्या वेळी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या.
*उद्दिष्टांचा ठराव*- पंडित नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. २२ जानेवारी १९४७ रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला. या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे आणि तिचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्याचे कार्य केले. *त्यातील काही तरतुदी* पुढीलप्रमाणे आहेत-
* *भारत*हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य असेल.
* *सत्तेचे* उगमस्थान – भारतीय जनता आहे.
* *सर्व* लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता इ.ची हमी व संरक्षण दिले जाईल.
* *अ*ल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्यासाठी संरक्षक तरतुदी असतील.
* *राष्ट्रीय* एकात्मता जोपासली जाईल.
राज्यघटना कामकाज समित्या – घटना समितीने एकूण *
*२२ समित्या* स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. विशेष कामकाजासंबंधीच्या काही महत्त्वाच्या समित्या पुढीलप्रमाणे होत्या.
* *मसुदा समिती* (अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब आंबडेकर)
* *मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती* (अध्यक्ष- सरदार वल्लभभाई पटेल)
* *घटकराज्यांबरोबर बोलणी करणारी समिती* (अध्यक्ष- डॉ. राजेंद्रप्रसाद)
* *केंद्र राज्यघटना समिती* (अध्यक्ष- पं. नेहरू)
* *मसुद्याची चिकित्सा करणारी समिती* (अध्यक्ष – आल्लादी कृष्णस्वामी अय्यर)
*भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्टये !!
भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक घेतल्याचे आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटेनवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व व्यवहाराचा प्रभाव पडल्याचे दिसते आणि स्वातंत्र्यलढय़ातून आकारास आलेल्या भारतीय परिस्थितीचे अपत्यदेखील मानले जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेला विशेष स्वरूप प्राप्त झालेले आहे…
????????????????????????
*क्रमशः*भाग 3 मध्ये उद्या✍????
~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com