भ्रष्ट अधिकार्यांनी निलंबनाच्या भितीने बंद केलेली रो.ह.यो कामे त्वरीत सुरू न केल्यास आंदोलन -प्रफुल्ल राठोड

मांडवी (प्रतिनिधी) – यापुर्वी किनवट-माहुर तालुक्यात अनेक कोटय़ावधीची कामे रो.ह.यो अंतर्गत झाली पण ती निकृष्ठ दर्जाची व टक्केवारीच्या पार्श्वभीवर झाली अनेक कामे न करता बिले उचलल्या गेलीPraphul Rathod त्यामुळे अधिकार्यावर कारवाई झाली. अनेकांचे निलंबन झाले तीच भिती बाळगुन आज कुठलाच अधिकारी रो.ह.यो ची कामे करण्यास तयार नसल्याने मजुरावर अन्याय होत असून ऊपासमारीची वेळ त्यांच्यावर आल्याने त्वरीत कामे सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा बंजारा सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा नेते प्रफुल्ल राठोड यांनी दिला. गेल्या दोन तीन वर्षाआधी कृषी विभाग, वनविभागा मार्फत किनवट व माहूर तालुक्यात कोटय़ावधींची कामे रो.ह.यो अंतर्गत झाली.पण त्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला. कामावर मजुर नसतांना ती दाखविण्यात आली. अनेक कामे कागदोपत्री झाली.

बोगस कामांचा पसारा वाढल्याने दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले. त्यामुळे रो.ह.यो कामे करण्याची धास्ती सगळ्याच विभागातील अधिकार्यांनी घेतली. आज सगळीकडे दुष्काळ परिस्थिती आहे. शेतरकी शेतमजुर या अस्मानी संकटात सापडला असून तांडेचे तांडे खाली होऊन कामाच्या शोधात मजुर परप्रांतात जात आहे. हाताला येथे काम नसल्याने ऊपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. गावातगावातील मजुर बाहेर गेल्याने गावात फक्त म्हातारी कोतारी मानसे व लहान मुलेच ऊरली आहे. मुलांच्या शाळेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रो.ह.यो ची कामे सुरू करणे आता गरजेचे झाले असतांना दोन्ही तालुक्यात कुठलेच कामे सुरू नाही. अधिकार्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पण त्याचा परिणाम आज मजुरावर होत आहे. त्यांची शिक्षा गरीब मजुरांवर का ? असा प्रश्नही प्रफुल्ल राठोड यांनी उपस्थित केला. रो.ह.यो चे कामे त्वरीत सुरू न केल्यास बंजारा सेवा संघाच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले असून त्यांनी प्रत्येक गाव तांडय़ा वाडय़ात मोठय़ा प्रमाणात मजुर उपलब्ध असतांना अधिकारी मात्र मजुर उपलब्ध नसल्याचा खोटा कांगावा करीत असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. अशा भीषण परिस्थितीत जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे मजुरवर्गाचे लक्ष लागले आहे.