- संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा माता” मंदिराच्या जागेची आमदार यांचे स्विय सहाय्यक यांनी केली पाहणी
बंजारा लाईव्ह, सतिष एस राठोड
कल्याण :- दि.४ सप्टेंबर रोजी मोहोने, आंबिवली (पूर्व) येथील बंजारा समाजाचे ‘आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी-जगदंबा माता’ मंदिराच्या लहुजी नगर,येथील नियोजित जागेची कल्याण(प.) विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशावरुन त्यांचे ‘स्विय सहाय्यक प्रविणभाऊ हेंद्रे’ यांनी पाहणी करुन मंदिर या जागेवर खूप वर्षापूर्वीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
- या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांनी मंदिराविषयी अधिक माहिती घेण्यासाठी “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन-अशोकभाऊ चव्हाण, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बंजारा समाजातील स्थानिक समाजबांधवांशी दिलखुलास चर्चा केली. या चर्चेदरम्यान अशोकभाऊ चव्हाण यांच्यासह सर्व बंजारा समाजबांधवांनी त्यांना संत सेवालाल महाराज आणि देवी-जगदंबा माता यांचे मंदिर लवकरात लवकर मा.कार्यसम्राट आमदार-नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या आमदार निधीतून साकार व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली. यावेळी मा.प्रविणभाऊ हेंद्रे यांनी समाजबांधवांना व राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या सर्व पदाधिकारी यांना सांगितले की, हे मंदिर मा.आमदार नरेंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रयत्नाने आणि निधीतून लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल
- यावेळी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे मुंबई प्रदेश सचिव-सुरेश पवार,कल्याण तालुका सचिव-केवलसिंग तंवर,अटाळी-आंबिवली शहराध्यक्ष-गोकुळ राठोड,उपाध्यक्ष-गबरु राठोड,समाजसेवक-विठ्ठलभाऊ राठोड,यांच्यासह राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे पदाधिकारी उपस्थित होते.