नुकतेच माझ्या हाती माझ्या एका मित्राने म्हणजेच साप्ताहिक बंजारा पुकारचे संपादक श्री गोविंदराव चव्हाण यांनी भेट दिलेले ‘मनक्या निती’ नामक श्री संत सेवाभायावर आधारित असलेले ग्रंथ पडले अन मी त्याच्या प्रातच पडलो. त्यातील काही पाने चाळू लागलो तर मला असे दिसले की हे ग्रंथ नुसतेच बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या संत सेवाभायाचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे वेगळे प्रयत्न करत नाही तर ते या जीवन सृष्टीचे चक्रही समजावून देण्याचे प्रयत्न करताना दिसते. या ग्रंथात सत्य युग, द्वापार युग, त्रेता युग, कलियुग या चार वेदांची सविस्तर माहिती वाचकांना देण्याबरोबरच ते वेद का ? व कशासाठी ? ब्रम्हदेवाने निर्माण केलेले आहे. हे या ग्रंथात सविस्तर विविध उदाहरणा दाखल सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केलेले आहे. तसेच या ग्रंथात समकालीन परिस्थिवचर भाष्य करत-करतच हे ग्रंथ मागणसा माणसातील निती अनिती, कुटनिती चाणक्य निती माणसाच्या स्वतंत्र आचार विचारावर त्यांची स्वतःची निती कशा पध्दतीची असली पाहिजे, वैयक्तिक नितीच माणसाचे, समाजाचे, देशचे कल्याण अथवा अकल्याण करू शकते. याचेही सुंदर विवेचन या मनक्या नितीत लेखक पी.बिंदू नाईक यांनी आपल्या कसदार लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या ग्रंथात लेखक पी.बिंदू नाईक यांनी भारताचा पूर्व ईतिहास कसा होता हे पटवून देत असतानाच ते राजे महाराजांचे, शुर विरांचे, सत विभूतिंचे, उपदेश लोकांसाठी कसे उपयोगी होते तसेच रामायण, महाभारतातील काही उदाहरणे देवून त्यातील चांगलेपण व वाईटपण वाचकांना समजावून देण्याचे प्रयत्नही केलेले या ग्रंथातून आढळते.
संत सेवालाल यांचे जन्म त्यांचे कुठ वारसदार त्याच्या आईवडिलांनी पुत्रप्राप्तीसाठी माता जगदंबेची केलेले पूर्व भक्ती त्यामुळे त्यांना बारा वर्षानंतर मिळालेले पुत्राचे फळ म्हणजेच श्रीसंत सेवाला महाराजा सारख्या पूत्राचे जन्म घेणे. त्यानी पुढे चालून आपल्या सवंगडय़ासह गाई वरती केलेली लदेणी (धान्याचे व्यापार) हे करत असतानाच माता जगदंबाने अचानक पणे त्यावर बळेवळेच लादलेली भक्ती समाजावून त्यांना त्याच्या भक्तीसाठी तयार करतानाचे द्वंद, होकार नाकाराचे नाटय़ लेखकांनी मोठय़ा रंजक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेले दिसून येते. हे ग्रंथ वाचत असताना आणखी पुढे काय घडणार आहे ? हे संत सेवाभाया कशा पध्दतीने जगदंबेची ही भक्ती स्वीकारणार की नाही ? असे असंख्य प्रश्न वाचकांच्या मनात सतत निर्माण होवून वाचकांचे कुतूहल जागे करून जाते ही मनक्या निती मनक्या नितितून लेखकाने वाचकांना
श्री संत सेवाभायाचे चरित्र सांगत सांगत त्यांना जीवनांचे तत्वज्ञान ही सांगून जाते. तसेच या मनक्या नितित लेखकाने सेवाभायाचे सत्यवचनही भरपूर सांगितलेले आहे. या पुस्तकातील बाराव्या अध्यायात ते या सत्यवचना विषयी लिहिताना
म्हणतात बंजारा भाषेत ः-
कलियुगा कलोळो मच जाए ।
हर धर्मेर होळी विए ।
आशी ए युगेर गत विए ।
एक दुसरेर आदर कोणी करिए ।
म्हणजे कलीयुगात नुसता कलह निर्माण होईल प्रतेक धर्माची होळी होईल कोणीही आपआपल्या धर्मा प्रमाणे वागणार नाहीत धर्माधर्मात अंधाधूंदी माजेल ? अशी या युगाची रित राहील. असे सेवाभायाचे सत्यवचन या ग्रंथात लोकांना समजावून देण्याचे प्रयत्न यातून झालेले आहे. यातील प्रत्येक वचन माणवाला विचार करायला लावणारे आपल्या वर्तणात बदल घडवू पाहणारे निश्चित झालेले आहे. एकंदरीत हे मनक्या निती ग्रंथ खूपच वाचनिय व संग्रही ठेवण्यासारखेच झालेले आहे.
यातील पी बिंदू नाईक यांची आगळी वेगळी लेखन शैली व श्री संत सेवालाल महाराज वरचे हे चरित्र वाचू पाहणार्या वाचकांना हे ग्रंथ ऐकदा तरी वाचायला हरकत नाही. त्यांच्या पुढील लिखाणास माझ्या हार्दिक शुभेच्छा
-शेषराव जाधव (शिक्षक)
लोहा जि.नांदेड
मो. 9923094332.