कल्याण – हरित क्रांतीचे प्रणेते तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी करसन राठोड यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे महानायक वसंतराव नाईक यांनी राज्याला सुजलाम् सुफलाम् केले असून हरित क्रांती ,पंचायत क्रांती घडवून आणली आहे. राज्यात चार चार कृषी विद्यापिठाची स्थापना केली ,संकरीत हायब्रीड ज्वारी बियाण्याची वाण विदेशातून आणून हरित क्रांतीची निर्मिती केली. गांव तेथे शाळा ,रोजगार हमी योजना ,कापूस एकाधिकार योजना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला . गोर गरीबांना रोजगार उपलब्ध करून दिला. राज्यात शासकीय लॉटरी पद्धत पण चालू केली .राज्यात दुष्काळ निवारण करण्यासाठी उजनी जायकवाडी व अजून विविध धरणे निर्माण केली. महाराष्ट्र राज्याला पाण्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे “पाणी आडवा पाणी जिरवा ” असे अनेक योजनांची त्यांनी पाया घातला ,महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा कैवारी , असे महान व्यक्तीमत्व आणि विद्वान कार्य असूनही ते भारतरत्न या पुरस्कारापासून वंचित राहीले म्हणून महानायक वसंतराव नाईक यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार देवून त्यांचा कार्याला न्याय द्यावा असे अवाहन बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसन राठोड यांनी पत्राव्दारे केले आहे.