महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रभूषण बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ कर्मवीर दादा इदाते यांना प्रदान

श्री. सतिष एस राठोड

संगमनेर :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रभूषण बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ गेली ४० वर्षे भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी निस्वार्थ कार्य करणारे,या उपेक्षित व वंचित समाजाला प्रवाहात अाणणारे राज्य,देश अाणि देशाबाहेर सुध्दा विविध पुरस्काराने सन्मानित केलेले ॠषीतुल्य व्यक्तिमत्व केंद्रिय इदाते अायोग (२०१५-२०१८) चे मा.अध्यक्ष तथा देशपातळीवर विमुक्त घुमंतू जनजातीसाठी कार्य करणार्‍या विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अखिल भारतीय) या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांना रविवार दि.१८ नोव्हेंबर २०१८ रोजी सिद्धिविनायक लाॅन्स,संगमनेर,जि.अहमदनगर येथे अायोजित केलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

प्रसंगी कर्मवीर दादा इदाते यांनी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ करीत असलेले कार्य, त्यांनी समाजाप्रती व्यक्त केलेल्या भावना,भविष्यातील नियोजित विविध योजना अाणि राज्यभर सातत्याने घेत असलेल्या अशा अधिवेशनासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री.विलासजी कोळेकर अाणि पत्रकार संघाचे अभिनंदन केले अाणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अादणीय दादांनी राज्यभरातुन अालेल्या पत्रकारांना लोकशाही बळकट करण्यासाठी, समाजात समता, समरसता, बंधुभाव निर्माण करण्यासाठी, समाजातील उपेक्षित वंचित घटकांचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे असे सांगितले.

या राज्यातील व देशातील विमुक्त भटके समाजाचे प्रश्न अतिशय जटील असुन अद्याप हा समाज समाजिक ,शैक्षणिक व राजकीय प्रवाहापासुन खुप दुर अाहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे यासमाजाप्रती अतिशय संवेदनशील असुन या सरकारने केंद्रिय इदाते अायोगाची अंमल बजावणी करण्याची प्रक्रीया चालू केली अाहे असेही सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातुन मला हे कार्य व सेवा करण्याची संधी मिळाली अाहे. त्यामुळे हा अापण दिलेला पुरस्कार अाणि सन्मान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अाणि विमुक्त घुमंतू (भटके) जनजातींना मी समर्पित करित अाहे अशी भावना दादा इदाते यांनी व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अा.बाळासाहेब थोरात,पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री.विलासजी कोळेकर,अा.रुपनर,शिवशाहीर तनपुरे महाराज,अा.सुधिर तांबे,रुपचंद भागवत,वंजारी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचे राज्य कार्यवाह श्री.अनिल फड,विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या राज्य उपाध्यक्षा सौ.संपदा पारकर,पत्रकार संघाचे डाॅ.संजय सोनावणे,प्रशांत लाड,संजय नवले यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

या सन्मान सोहळ्यासाठी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद च्या वतिने राज्य उपाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी भोसले,मा.श्री.माणिकजी रेणके,सहकार्यवाह मा.श्री.दिलीपजी परसने,राज्य उपाध्यक्ष मा.श्री.नितिनजी गिरी,मा.श्री.अर्जुनजी भोई हे पुर्णवेळ उपस्थित होते.