माझं गाव माझी मानसं, चिल्ली ईजारा या वाटस्अॅप गृपने गरीब मुलीच्या लग्नासाठी दिले २१,०००/-रू आर्थिक मदत.
चिल्ली ईजारा ता.महागाव जि.यवतमाळ येथील रहिवासी स्व. बंडू तरटे यांचे दोन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांना एकूण चार मुली आहेत त्यापैकी दोन मुली उपवर झाल्या आहेत.
घरातील कर्ता पुरुषाने जगाचा निरोप घेतल्यामुळे आधीच दुःखाचा डोंगर त्यात दोन दोन उपवर मुलींच्या लग्नाची जबाबदारी कशी पार पाडायची अशा आर्थिक, मानसिक संकटात सापडलेल्या परिवाराच्या मदतीस धावून आला अखा गाव.
ज्यांना जे शक्य आहे त्याने ती पुर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्यात अॅटो संघटना, मंडप डेकोरेशन, गिरणी अशा विविध व्यावसायिक समुहांनी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
गावकऱ्यांनी जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये रोख जमा व नववधूना लागणा-या संसार उपयोगी साहित्य दिले.
यापूर्वीही गावकऱ्यांनी धनसिंग पवार या गरीब व्यक्तिच्या मुलीचा विवाह लोकवर्गणीतून मोठ्या थाटामाटात पार पाडले होते.
चवदाशे ते पंधराशे मतदानाची यादी असलेल्या चिल्ली (ई) या गावात जवळजवळ आठ ते दहा जातीचे लोक राहतात यात बंजारा, आदिवासी, बौद्ध,ब्राम्हण,वोडर,न्हावी, कोळी,बेलदार,महार अशा वेगवेगळ्या समुहातील लोकांत बंजारा, आदिवासी व बौद्ध मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये सर्वात मोठा समुदाय असलेल्या बंजारा समाजात आजही एक नायक, एक कारभारी तांडयाचे नेतृत्व करीत आहे.
असा एकोपा गावाच्या मातीतून शिक्षण घेऊन नौकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर पडलेल्या कर्मचारी वर्ग, व्यावसायिक, खाजगी नौकरी करणारे एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी किंवा अशा गरीबांना संकट समयी मदतीचा हात पुढे केल्यास पंचक्रोशीत चिल्ली ईजारा गावांचे नावं आदर्श गाव म्हणून नावाजल्या जाईल अशी संकल्पना माझं गाव माझी मानसं गृपचे गृप अॅडमिन कवी.निरंजन मुडे यांनी गृप मध्ये चर्चा केली त्या चर्चेला सर्व गृप मधील सदस्यांनी होकार दिला आणि २१,०००/- आर्थिक मदत जमा करून स्व.बंडू तरटे यांच्या परिवाराला आर्थिक मदत केली.
एका गरीब परिवाराला संकट समयी मदतीचा हात दिल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन.
—- निरंजन मुडे.
प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार 8976305533