“माझा बंजारा समाज आज पण संघर्ष करतोय”

” माझा बंजारा समाज आज पण संघर्ष करतोय”
स्वत:चे संगीत..(थाळी-नंगारा) भजन,लेंगी फागण तीज काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. बंजारा तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/भाट,ढाडी/ढालिया,कलापथक नाटक कारां द्वारे होत होते,आजही तुरळक पणे होताक. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करुन ठेवले आहे.
बंजारा समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापा-यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम बंजारा समाज पुरातन कालापासुन करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थिती जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील बंजारा चे योगदान वाढत गेले. महिनोनमहिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो कि बाजारबुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो कि युद्धभुमीवरील, बंजारा तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. वेळ प्रसंगी खंबीरपणे लढण्यांस सज्ज होत, दहापाच सहज लोळवून शंभर कत्तल करणारा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजुसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने बंजा-यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे याचे कारंण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत चालु होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे बंजारा तांडे येत असत, याची नोंद कोलाबा ग्यझेटियरने केलेली आहे. अनेक बंजारांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.
थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतुक, फिरता व्यापार यात बंजारा,लमाण,गोर समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनु लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादुन भ्रमंती करनारा तांडा समाज दूर फेकला जावू लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहुन व्यवसाय करणारा समाज यामुळे एका विचित्र वळनावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. मग डोंगर पायथे, कडा,दरी,नदी जवळ करुन तर काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे. नंतर ऊस-तोड व आता बांधकाम,रस्ते निर्माण,शेती कार्य वगैरे…
क्षत्रिय वंशातुन निर्माण झालेला हा समाज भारतीय संस्कृती कोषात क्षत्रिय वंशाची भटकी जात असा उल्लेख सापडतो. ब्रिटीशांनी गुन्हेगार ठरवून D.Notifide/ Non Tribe चा शिक्का मारला.तो स्वातंत्र्यानंतर ही तसाच आहे, भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली ही एके काळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व बिहार , मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरयाणा या राज्यांत आढळते. अनेक बंजारा स्वत:ला मारवाड/राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उप जाती/जमातीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा डाग  दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते लंबाडा सुगाळी, दिल्लीत लमाण-शिरकिवन, राजस्थान व केरळात बन-गवरिया व गूजरातमध्ये चारण-’बन-जा-रहा’ म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वन बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमाती संबंधीचे संशोधन प्रथम प्रसिध्द केले. त्यांच्या मते बंजारा यांच्या प्रमुख चार आडनावे आहेत..
चव्हाण,राठोड,पवार व जाधव नंतर नाईक ही पदवी तद् नंतर आढे-मुढे आहेत, हरावत,खोला,पालथिया, वडत्या,लाव्हडिया,आमगोत,लुणसावत, अजमेरा, झरपला वगैरे. विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. बंजारा समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्र अंध्र प्रदेश करनाटक,बंजारा समाजेचे श्रद्धास्थाने म्हणजे सेवा भाया, सामकी याडी, सामत दादा,तुळजाभवानी, गिरजादेवी, गुरु नानक,आणि बालाजी या समाजातुन उदयाला आलेले थोर संत म्हणजे जगदगुरु सेवालाल महाराज.बंजारा समाजाची सेवा भाया वर अपार श्रद्धा आहे. या करीता समाजाला जुडने अवशक आहे माझ्या समाजाच्या बांधवानी एकञ येऊन समाजाची संस्कृतीची राखन करावी असी मि विनंती करतो,व समाजाच्या गोर गरीब बांधवाना खरा न्याय मिळावा,गरीब विद्यार्थ्याना भरपुर शिक्षण मिळावा,आपल्या समाजा मध्ये खुप मोठ मोठे बुद्धिजीवी अधिकारी वर्ग असुन सुद्धा समाज एकवटलेला नाही याची खत वाटते…सिका संघटीत व्हॉ,सघर्ष करा…👏जय सेवालाल..
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड..स्वयंसेवक
गोर बंजारा संघर्ष समिती भारत,
मो.९८१९९७३४७७

image