माझ्या तमाम समाज बंधू व सर्व मित्रांना १ मे महाराष्ट्र दिन विशेष, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा :- श्री एकनाथ पवार नागपुर

१ मे महाराष्ट्र दिन विशेष

शाहु फुले आंबेडकराचा  पुरोगामी महाराष्ट्र. साहस,त्याग आणि विविधतेनी नटलेल्या या संघर्षशाली बहुभाषिक  प्रांतरचनाच्या निर्णयानंतर आपल्या   महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.अशा संघर्षशाली महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण..? बहुजन कि ब्राह्मण..? तत्कालिन परिस्थिती ही अतिशय विपरीत जाती धर्मात गुरफटलेली.विदर्भ,प महाराष्ट्र आणि मराठवाडा याची समिकरणे ही तितकीच भरकटलेली.लोकप्रिय व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण यांना देखिल अंतर्गत विरोध जोर धरत होता.परंतु यशवंतरावाचे परमस्नेही वसंतराव नाईक साहेबानी मोठी उदारता दाखवून विदर्भातील आमदाराचा पाठिंबा यशवंतराव चव्हाण यांना दिला.आणि राज्याचा पहिला मुख्यमंत्री म्हणून सुवर्णाक्षरानी चव्हाण साहेबाचा नाव कोरल्या गेला. यशवंतरावाना राज्याचा पहिला मुख्यमंत्री बनवण्यामागे वसंतराव नाईक साहेबाचा खुप मोठा हात होता,असे त्यांचे राजकिय शिष्य खुद्द शरद पवार यांनी अनेकदा कबुली दिली.यशवंतराव चव्हाण म्हणजे लोकप्रियतेचा आणि सृजनतेचा मुकुटमणी.     १ मे हा दिन राज्य निर्मिती दिन म्हणून जेवढा प्रेरक आहे,तेवढाच प्रेरक क्षण म्हणजे याचदिवशी लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमण्यात आली.सत्तेचे विकेंदिकरण करुन सर्वसमावेशक विकास व बहुजनाना न्याय कसे प्रदान करता येईल यासाठी ही ऐतिहासिक समिती होती.या ऐतिहासिक समितीचे अध्यक्ष वसंतराव नाईक साहेबाना देण्यात आले.तेव्हा नाईकसाहेब महसुलमंत्री होते. वसंतराव नाईक साहेबाच्या शिफारशीने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था उद्यास आली.लोकशाहीचे खर्याअर्थाने विकेंद्रीकरण झाले.म्हणून त्यांना *पंचायतराज चे जनक म्हणूनही* संबोधतात.  मा.इंदिराजी ने     राजे यशवंतराव चव्हाण यांना  दिल्ली ला बोलावले.देशाचे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली.पुढे मा.सा. कन्नमवार यांच्या अल्पशा कारकिर्दिनंतर राज्याचा सिंहासनावर राजे वसंतराव नाईकसाहेब विराजमान झाले.येथूनच खर्या अर्थाने आजच्या सक्षम,आधुनिक,सर्वसमावेशक महाराष्ट्राची भक्कम लोकप्रिय उभारणी झाली.  आजचा महाराष्ट्र आणि तत्कालीन महाराष्ट्र यामध्ये खुप मोठे फरक.परंतु यशवंतरावराजे चव्हाण यांनी सर्वांगसुंदर राज्याची पायाभरणी केली.राज्याची पुरोगामी बीजे मातीत रोवली.आजचा जो महाराष्ट्र उभा आहे.करोडो मराठी माणसाच्या ह्रद्यात, संबंध महाराष्ट्रियनाच्या कालजात अधिराज्य गाजवणार्या राजे यशवंतराव चव्हाण आणि राजे वसंतराव नाईक साहेबाची कृपादृष्टी,प्रगल्भ दूरदृष्टीचे एकमेव फलित होय.या महाराष्ट्राने राजे वसंतराव नाईकाच्या रुपाने भारत देशाला हरितक्रातीचे बीजमंत्रर  दिले. एवढेच नव्हेतर आजची जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरलेली मनरेगा योजना  ही नाईकसाहेबांची देण.म्हणून त्याला वसंतराव नाईकाची रोजगार हमी योजना म्हटल्या जाते.सर्व सामान्याचं हित ,ग्रामिण सक्षमीकरण याशिवाय राज्याचं वैश्विक दृढीकरण यामध्ये सामावलेलं आहे. शेतकर्याचा,कष्टकर्याचा, कामगाराचा महाराष्ट्र म्हणून नावारुपास आणल्या गेले.                 आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस.मराठी माणसाला लोकप्रिय मुख्यमंत्री  वसंतरावराजे नाईकांनी खर्याअर्थाने बहुमान  पहिल्यांदा प्राप्त करुन दिले.ते म्हणजे १मे १९६६ पासून मराठीला शासनाची राजभाषा म्हणून घोषित केली.मराठीच्या राज्यभिषेकाचा दिवस म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सूवर्णाक्षरानी लिहिला गेला.२७ फेब्रुवारी हे दिवस कुसुमाग्रजाची जयंती मराठी भाषागौरव दिन आहे.परंतु मराठी राजभाषा दिन १मे आहे.याच दिवशी नाईकसाहेबानी अधिकृत आदेश देखिल काढले होते.                       शेतकर्याना मंत्रायालयाचा दार उघडून देणारा,”शेतकरी जगला तरच लोकशाही टिकेल.”असे अभिजात कर्तृत्वाची पेरणी करून गेलेल्या नाईकसाहेबा सारखा लोकोत्तर व्यक्तीमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले.हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.छत्रपती राजर्षी शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन परिसस्पर्शाने राज्याचा अभिजात सौंदर्य,औदार्य,प्रतिष्ठा अबाधित आहे. लोककल्याणाचा वारसा अधिक समृद्ध करणार्या राजे यशशवंतराव चव्हाण,राजे वसंतराव नाईक यांच्या स्मरणाशिवाय राज्याचा आधुनिक इतिहासाचा पान पुढे सरकुच शकत नाही. महाराष्ट्र गौरवशाली करण्यात अखंड महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणारे शूरवीर,महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा गतिशील करण्यात योगदान देणारे साहित्यिक,कवी,लोकशाहिर यांचाही योगदान आहे. यासह मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि सुधाकरराव नाईक यांचाही योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.महाराष्ट्राला अधिक सक्षम करुया.वसंतराव नाईकसाहेबाच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र पुढे नेऊया . एक प्रगत व सेक्यूलर महाराष्ट्र म्हणून चेहरा असलेल्या महाराष्ट्राचं सौंदर्य जपूया.     सर्वांना १मे महाराष्ट्र दिन,१मे मराठी राजभाषा दिन,१मे महाराष्ट्र लोकशाही विकेंद्रीकरण दिन आणि 1 मे अंतरराष्ट्रीय कामगारदिनाच्या सर्वाना मानाचा जय महाराष्ट्रर…
सौजन्य: गोर कैलास डी राठोड

गोर बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

Tag: Banjara News , Banjara Live, Gorbanjara