मा.आ.हरिभाऊ राठोड साहेब यांनी क्रीमीलेअर चा प्रश्न मांडून व सरकार कडून महिन्याभरात ते सोडवण्याचे आश्वासन

माझ्या सर्व बांधवांनो, परवाच विधानपरिषदेत मा.आ.हरिभाऊ राठोड साहेब यांनी क्रीमीलेअर चा प्रश्न मांडून व सरकार कडून महिन्याभरात ते सोडवण्याचे आश्वासन घेऊन सर्व भटक्या विमुक्त घटकांना त्यांचे हक़्क परत मिळून देण्यासाठी आशादायी प्रयत्न केलेला आहे. परंतु सरकार कडून मागे सुद्धा असेच आश्वासन देऊन पुढे काहीही झालेले नाही, हे सत्य आहे. त्यामुळे आपल्याला इतक्या वरच अवलंबून न राहता विधानसभेत सुद्धा हा मुद्दा उचलून धरावा लागेल.त्यासाठी विधानसभेतील आपल्या आमदारांना हा प्रश्न तातडीने सोडवण्याची आवश्यकता समजावून सांगावी लागेल. कारण सध्या शाळेतील प्रवेश व इतर अनेक कामांसाठी नॉन-क्रीमीलेयर च्या अटी मुळे आपल्या समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी तातडीने उद्या संध्या. 5 ते 7 वाजेच्या दरम्यान विधानसभेतील आपल्या आमदारांना सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधीनी भेटण्याचे ठरले आहे. तेव्हा कृपया 5 वाजे पुर्वी विधान भवन परिसरात सर्व प्रतिनिधीनी हजर रहावे, ही विनंती.(कृपया याबद्दल आपण आपली मते सुद्धा नोंदवा.)

TAG: Haribhau Rathod, Rashtriya Banjara Kranti Dal