मुंबईसारख्या विकसीत व आर्थिक राजधानी असणार्या महानगरीतील ही दृष्ये आपल्याला हेलावणारी आहेत…

मुंबईसारख्या विकसीत व आर्थिक राजधानी असणार्या महानगरीतील ही दृष्ये आपल्याला हेलावणारी आहेत…
गेली सात आठ दशके मुंबईत स्थायिक झालेली असंघटीत मच्छी कामगारांच्या मुलांची अवस्था अत्यंत दयनीय आहे,त्यांना शैक्षणिक सुविधा तर नाहीच नाही ऊलट लहान व किशोरवयीन मुलांना घरी ठेवल्यास काहीतरी अघटीत घडते तर कामाच्या ठिकाणी सोबत नेल्यास बालकामगाराच्या बडग्याखाली त्याना ताब्यात घेण्यात येते अशा अवस्थेत त्या मुलांचा पर्यायाने कामगारांचा सर्वांगिण विकास होणार कसा? हा ऊद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन मा.राज्यमंत्री,महसूल,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नाने या कामगारांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे पोलीस प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांनी बालकामगारांना दोन ते तीन वेळा ताब्यात घेवुनही त्यांची समस्या सुटलेली नाही आम्ही मध्यस्थी केली त्या बालमजुरांना सोडुन आणले आता गरज आहे त्यांच्यावर ही वेळच येवू नये यासाठी त्यांच्या मूळ समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळुन हातभार लावुया.निलेश प्रभु राठोड