“याडीकार पंजाबराव चव्हाण एक निष्ठावंत मार्गदर्शक”

“याडीकार पंजाबराव चव्हाण एक निष्ठावंत मार्गदर्शक”

मित्र हो जय सेवालाल,👏🏻
आमचे सामाजिक कार्य  प्रेरणास्थान व कुशल मार्गदर्शक
बंजारा लोक साहित्यकार मा.श्री पंजाबराव लालसिंग चव्हाण.
रा.पुसद जि.यवतमाळ.
आज समाजातील भरपुर साहित्यकारां पैकी मा.चव्हाण सर यांचे पण नाव साहित्य कलेत लौकिक आहे.
या होष्टीचे आम्हा नवयुवकांना मनापासुन गर्व आहे. कारण समाजातील बंजारा लोकतंत्र या गोष्टी लक्षात घेतल्या नंतर असे विचार येतात कि आपल्या समाजातील साहित्यकार बुद्धिजीवी मार्गदर्शकां कडुन एवढे  काई शिकण्यासारखे आहे. तरी समाजातील नवयुवक व विद्यार्थी मित्रांना वाचनाची गोडी का नाही..? मित्र हो बंजारा समाजातील साहित्यकारांचे विचार आपण जर घेत राहिलो तर खरोखर आपल्या स्वतः मध्ये खुप चांगली प्रगती निर्माण करू शकतो.
असेच बंजारा साहित्यकारांमध्ये असलेले लेखक चव्हाण साहेब यांचे  विचार व संवाद मी स्वतः घेतलेले आहे.  त्याचे विचार खुप शक्ती प्रदान करणारे व आपल्या जीवनात यशस्वी ठरवुन देणारे विचार आहेत.
चव्हाण साहेबांची ओळख म्हणजे पुसद तालुक्यातील एका छेट्याशा टांड्यातुन शहरात स्थलांतर होऊन पण स्वत:ला टांड्या पासुन दुर ठेवलेल नाही.
समाजातील सर्व सण उत्सव स्वतः टांड्यामध्ये जाऊन साजरे करणारे व सामाजिक बाधिलकी जपणारे  मा.चव्हाण साहेब एका लहानश्या टांड्यात जन्मलेले  वसंतपुर ता.पुसद जि.यवतमाळ.येथिल रहिवासी.
त्यांनी खुप गरीब असलेले लालसिंग देवला चव्हाण यांच्या।परिवारात जन्म  घेऊन स्वत:च्या विचाराधीन शिक्षण घेऊन आज ज्या पदावर कार्यरत आहे  ही खुप गर्वाची बाब आहे.
त्याच्या “याडी” या पुस्तकात त्यांनी त्या स्वत:  विषयी आपण काय करू शकतो  हे दाखऊन दिले आहे.
आई वडलांन पासुन तर समाजातील सर्वांविषयी प्रेमाणे राहणारे श्री चव्हाण साहेब यांचे पहिले पुस्तक ” याडी “हे खुप चागले लिहले त्या पुस्तका बदल त्यांना पुरस्कार पण मिळाले आहे त्या पुस्तकात त्यांनी नवयुवकांना शब्द रूपी खुप मोठी ताकत देऊन स्वत:च्या जीवनाचा पाया कसा रोपला पाहिजे हे दाखऊन दिले.
त्यांनी आज पर्यंत निरनिराळे पुस्तक लिहले असुन ते वेगवेगळ्या संघटनेच्या, व संस्थेच्या वतिने पदभार पण भुषवुन खरोखर समाजतील नवयुवका समोर आदर्श निर्णाण करून दिलेले आहे.
त्यांचे विचार व त्यांचे शब्द स्वत:ला घडविण्यासाठी उपयोगी ठरतात.
खरोखर मा.चव्हाण साहेब समाजातील आदर्श साहित्यकार अाहे.
त्यांच्या सर्व कार्याचे अभिनंदन व पुढील कार्यास मनापासुन शुभेच्छा…
जय सेवालाल..
आपल्या प्रेरणेतून घडलेला एक विद्यार्थी.

गोर कैलास डी.राठोड
सामाजिक कार्यकर्ता.
रा. सावरगांव बंगला ता.पुसद
जिल्हा यवतमाळ
9819973477

image

image

image

Gajanan D Rathod
Chief Editor – Banjara online news portal
www.banjaraone.com
Mobile – 9619401377