राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न

  • मुंबई :- दिनांक ८ मार्च रोजी राष्ट्र सेवा दल मुंबई , घरेलू कामगार चेंबूर विभागाच्या प्रमुख साथी. हर्षदाताई भालेकर यांनी जागतिक महिला दिना निमित्त एकल व घरेलू कामगार महिलांना एकत्रित करून कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात ज्येष्ठ घरेलू कामगार महिलांचा सत्कार केला तसेच राष्ट्र सेवा दल मुंबईचे साथी. दिपक सोनावणे व ज्योती बामगुडे यांनी महिलांना सोबत परिवर्तनाची गाणी घेतले त्याच बरोबर युध्द आणि महिला या विषयावर मार्गदर्शन केले.

  • देशात युध्द व निवडणूकीचे वातावरण निर्माण झाले आहे आशा परिस्थिती सगळीकडे युध्दज्वर पसरलाय असहिष्णुतेने टोक गाठले.

जागतिक युध्दांचा इतिहास हेच सांगतो की युध्दाची थेट झळ ही महिलांना लागते
मग ती जवळचे पुरूष युध्दात गमावल्यापासुन ते अनेक प्रकारच्या शोषण होण्यापर्यंत
युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडते, महागाई, जीवनावश्यक वस्तूंची चणचण हे विषयही घर चालवताना महिलांनाच हाताळावे लागतात म्हणून आज या कार्यक्रमात एकल महिला व घरेलू कामगार महिलांनी शांतीचा आग्रह धरला व युध्द नको शांती हवी, युद्ध नको मुलांना शिक्षण हवे, युद्ध नको घरेलू कामगार म्हणून हक्क हवे, युद्ध नको मुलांना सुरक्षित वातावरण हवे, युद्ध नको आम्हाला रोजगार हवा ही मागणी करत महिला दिन साजरा केला या कार्यक्रमात अनेक एकल व घरेलू कामगार महिला उपस्थित होते.