‘लिखनाको इतिहास आसो ‘
………
इतिहास साक्ष देणार होता
बंजारा तुझ्या गौरवाची
म्हणूनच कुणीतरी
घातला खोडा,
तुझा इतिहास मिटविण्यासाठी……..
तुच शोधत होता बंजारा
रोज नवी वाट , प्रगतीसाठी
सर्वांना मिळावी समान संधी
या घटनेच्या तत्वाचा
तूच होतास रे अधिपती…..
निसर्ग जपण्याचा संदेश देणारा,
होतास तू ‘संदेश वाहक ‘_..
तुझ्यावरच अन्याय करुन
का दिला तुला कुणीतरी
त्रास नाहक…….
तू ‘भटकतच ‘ रहावास
म्हणूनही कुणीतरी
धडपडत होता….
पण आज तुझ्या ,
गोरमाटीपणाचा तुला
इतिहास लिहायचाय
‘ गोरपान ‘तुझं सुवर्णपान
बनवायचं आहे…
म्हणून मारतो ‘ तुकारी ‘
तो क्रांतीसिंह सेवादास तोडावाळो
लिखनाको इतिहास आसो ,
गोरसंस्कृतीर ,
दुनियाम पडजायं वजाळो……
….. एकनाथ गोफणे……