“लोक नेते,धवल व जल क्रांतिचे जनक शिकारी राजा ना.सुधाकररावजी नाईक यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन” १० मे,
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष प्रशासक, महाराष्ट्र जलसंधारण तथा अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आधुनिक क्रांती घडविणारे क्रांतीसुर्य, महाननेता स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्म पुसद तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात गहुल या गावी २१ ऑगस्ट, १९३४ साली क्रांतीकारी बाबासाहेब नाईक यांच्या कुटूंबात झाला. अशिक्षित व मागासलेला बंजारा समाज, जुन्या व बुरसटलेल्या चालीरिती आणि जवळ जवळ साठ-सत्तर वर्षापूर्वीची परंपरागत समाज रचना अशा एकंदर वातावरणात वाढत असतांना नाईक साहेबांवर त्यांचे आजोबा स्व. फुलसिंग नाईक, बाबासाहेब नाईक व महाराष्ट्राची ११ वर्ष धुरा सांभाळणारे त्यांचे काका स्व. वसंतरावजी नाईक यांचा सुधाकरराव नाईक यांच्यावर बालपणीच्या परंपरागत संस्काराचाच परिणाम, प्रभाव व पगडा होता. त्यामुळे सुधाकरराव नाईक यांच्या व्यक्तीमत्व विकासाला लहानपणापासून एक वेगळे वळण मिळाले होते.
जन्म एसा लाभावा, देहाचे चंदन व्हावा ! अस्तीत्व संपले तरी, सुगंध दरवळत रहावा !!
स्व. सुधाकरराव नाईक यांचे माध्यमिक शिक्षण यवतमाळ तथा महाविद्यालयीन शिक्षण, विदर्भाचे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे -ााले. शिक्षण ही माणसाच्या विकासाची गुरूकिल्ली आहे हे वसंतरावजी नाईक यांनी ओळखले. ते नेहमी म्हणत माणुस घडतो, मोठा होतो तो त्याच्यावर होणा-या संस्कारातुन, त्यांच्या अतीभवतीच्या परिस्थितीतून, बि.ए. ची पदवी प्रप्त केल्यावर त्यांनी शेती व्यवसाय करण्याचे ठरविले त्याचबरोबर सामाजिक कार्याची जाण ठेवून त्यांनी कमला नेहरु वसतीगृह गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून स्व. वसंतरावजी नाईक यांच्या प्रेरणेने त्यांनी आपल्या पुज्य आजोबांच्या नावाने पुसद येथे १९६१ मध्ये फलसिंग नाईक महाविद्यालयाची स्थाना केली. आज त्या महाविद्यालयात शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रवाहात मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत. छोट्याश्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर -ााले आहे. राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव असताना त्यांनी शिक्षण सेवेत सर्व सोयी उपलब्ध करनू दिल्या अहेत. त्यांची सदैव आठवण रहावी याच हेतून महाविद्यालय परिसरात लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर, २०११ ला त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांचे राजकीय गुरु मा. शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते संपन्न -ााले आहे.
स्व. सुधाकरराव नाईक शिक्षण तथा साहित्य प्रेमी होते. यवतमाळ येथे भरलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य परीषदेचे त्यांनी उपाध्यक्ष पद भुषविले. त्याच काळात त्यांनी यवतमाळ येथे मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभरण्याच्या कार्यात सक्रिय भाग घेतला. त्यांनी पुसद व यवतमाळ येथे वैद्यकीय व शल्यक्रिया चिकित्सा शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करुन जनतेची प्रशंसा मिळविली. पुसद येथे १९६४ साली विदर्भ साहित्य संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली यशस्वीरित्या संपन्न -ााले त्यावेळी कार्यक्रमाची उपस्थिती पाहून साहित्यप्रेमी व महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांना खुप आनंद वाटला त्यावेळी ते म्हणाले, कर्तबगार सुधाकररावांना माझा आशिर्वाद आहे. एका नव्या नेतृत्वाचा उदय होत आहे. हे नेतृत्व महाराष्ट्राचा लौकीक वाढवेल अशी मला आशा आहे. त्यांच्या कतृत्वाची थाप एक नवा इतिहास घडविणार आहे.भाऊ प्रेरित -ााले त्यांना एक नवि दिशा मिळाली –
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी !
रोज नजने समोर एक नवी दिशा असावी !
घरट्याचे काय आहे बांधून घेता येईल केव्हाही !
मात्र आकाशा पलीकडे भरारी मारण्याची जिद्द नेहमी असावी !
गहुली गावाच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. त्यांच अंगी असलेल्या नेतृत्व गुणाची संघटन कौशल्याची सर्वांना ओळख झाली. त्याचसुमारास महाराष्ट्रात सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रयोग मा. वसंतराजी यांच्या तेतृत्वाखाली सुरू झाला. जनतेनी मा. वसंतरावजी नाईक साहेबांना विनंती केली. मा. सुधाकररावांनी पुसद पंचायत समितीचे सभापती पद स्विकारावे अससा आग्रह धरला. तसेच झाले. १९६२ ते १९७२ पर्यंत त्यांनी पुसदच्या पंचायत समितीची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्या काळात त्यांनी काँग्रेसची शिबिरे अतिशय नेटकेपणाने आयोजित केली. अनेक युवकांना त्यात सहभगी करुन घेतले. कार्यकर्त्यांची प्रचंड फळी निर्माण झाली. आपल्या कतृत्वाचा त्या विभागात दबदबा निर्माण केला.१९७२ ते १९७७ पर्यंत त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भुषविले. ते जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिवही होते. यवतमाळ जिल्ह्यात अनेक योजना त्यांनी राबविल्या. विकासाची गंगा वाहू लागली. त्यांच्या कल्पनेला पंख फुटू लागले, शेती विकासाची अनेक स्वप्ने त्यांच्या नजरे समोर तरळू लागली. एकामागुन एक विधायक उपक्रम हाती घेण्याचा त्यांनी सपाटाच लावला. या विधायक उपक्रमासाठी मा. वसंतरावजी नाईक यांचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे अनेक राष्ट्रीय पुढा-यांशी समाज सेवकांशी, नामवंत साहित्तीकांशी त्यांचा जवळून परिचय झाला. जसजससा परिचय वाढत गेला. तसतशी नविन जबाबदारी सोपविली गेली आणि मा. साुधाकररावांनी सर्व शक्ती एकवटून ती पार पाडावी असेच नेहमी घडत गेले.
सुधाकरराव नाईक एप्रिल १९७७ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. जुन १९७७ मध्ये ते राज्य विधान परिषदेवर नागपुर येथून स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडून आले. स्व. वसंतरावजी नाईक साहेबांच्या निधनापुर्वी सुमारे वर्षभराची घटना असेल सुधाकरराव नाईक यांचा महाराष्ट्र मंत्री मंडळात समावेश झाल्याबद्दल चोंढी येथे त्यांच्या सन्मानार्थ जेवण होते. शे-दिडशे निवडक निमंत्रीत जेवण संपवून उठले आणि सर्व जन शामियान्यात बसले त्या ठिकाणी सत्काराचा छोटासा घरगुती स्वरुपाचा समारंभ आयोजित करण्यात आला होतो. नाईक साहेब शिरिराने चांगलेच थकलेले दिसत होते. एकदम त्यांची प्रकृती सर्व लोकांना जाणवत होती. लोकांनी त्यांना नेहमी प्रमाणे हार घालणे सुरू केले. प्रारंभीचे एक दोन हार त्यांनी स्विकारले व नंतर ते म्हणाले आता मला कशाला सुधा ला पुष्पहार घाला. नाईक साहेबांचे हे उद्गार लोकांच्या हृदयाला हात घालणारे ठरले. आपल्या अंतसमयीची जाणीव आपल्या राजकिय वारसाची घोषणा आणि सुधाकर नाईकांच्या उज्वल भविष्याची हमी अशा कितीतरी सुखदुःखाच्या भावना त्या एका वाक्यात होत्या. शेवटी नाईक साहेबांचे स्वप्न साकार झाले व निधनानंतर बारा वर्षांनी सुधाकरराव नाईक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. सुधाकरराव नाईक कोणत्याही संधीचा पुरेपुर फायदा करुन घेण्यात यशस्वी होत कारण यशवंत व वसंत नितीचा अवलंब करुन महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा वारसा लाभलेल्या सुधाकरराव यांनी पक्ष आणि शिस्त शासन यांना मोलाची मदत केली. १९७८ मध्ये विधानसभेवर निवडून आले. मार्च ते जुलै १९७८ ते राज्य मंत्री मंडळात गृहनिर्माण खाते सांभाळत होते.
मा. सुधाकरराव नाईक यांच्याकडे शिक्षण व तांत्रिक शिक्षण खाते सोपविण्यात आले. तेव्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली. शिक्षणाला नवा आकार प्राप्त व्हावा यासाठी नव्या पिढिचे जिवन व राष्ट्राची गरज समोर ठेवून महाराष्ट्रात विनाअनुदान तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. तांत्रिक शिक्षण व वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी परप्रांतात शिक्षण घेत होते. त्यामुळे प्रतिवर्षी करोडो रुपयाचा ओघ परप्रांतात जात असे. आता तो ओघ बंद झाला आहे. त्यांच्या काळात ग्रामिण व दुर्गम भागात शाळांना मान्यता देवून ख-या अर्थाने ग्रामिण परिसराचा त्यांना विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नविन तंत्र-ाानाची दारे शहरी आणि ग्रामिण भागात खुली केली. महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रयत्नांची सुवार्ता मा. राजीव गांधी पर्यंत गेली. त्यांनी सुधाकरराव नाईक हे मा. शरदराव पवार साहेब यांच्या मंत्री मंडळात महसुल आणि संसदी कार्य व सांस्कृतिक मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व अकोला जिल्ह्यांसाठी अमरावती विभागाची निर्मीती करुन तेथे आयुक्ताचे कार्यालय सुरू केले. त्याचसुमारास अमरावती विद्यापिठाची निर्मीती करून निरनिराळ्या शाखा सुरू करून ज्ञानाची दालने खुली करून दिली. आज तेच विद्यापिठ वटवृक्षाप्रमाणे झाले असून अगदी नावारुपास आले आहे. कोणत्याही खात्याचे मंत्री असले तरी लोककल्याणाची नाडी त्यांना बरोबर समजली होती. मा. सुधाकरराव आणि कार्यकर्ते यांचे अतुट आणि अविभाज्य नातेच निर्माण झाले होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. सारा देश दुःखाच्या छायेत लोटल्या गेला त्याचवेळी लोकसभेच्या निवडणुका चालु होत्या. महाराष्ट्रात मा. शरद पवार साहेब व सुधाकररावजी नाईक यांनी अहोरात्र मेहनत घेवून ४० चे वर खासदार निवडून आणले. मा.पि.व्ही नरसिंहराव भारताचे पंतप्रधान झाले आणि मा.शरद पवार भारताचे संरक्षण मंत्री झाले. महाराष्ट्रात नेतृत्व बदल एकमुखाने होवून मा. सुधाकरराव नाईक २५ जून, १९९१ या मंगल दिवशी विदर्भाचे भुमिपूत्र मुख्यमंत्री झाले. स्व. वसंतरावजी नाईक व यशवंतरावजींचे स्वप्न पुर्ण झाले. या दिवसाला पुसदच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. पुसद नगरीला त्या शिवमंगल दिनी दुस-यांना वैभव प्राप्त झाले. पुसदस नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदी आनंद संचारला, रोषनाई, पेढे वाटप, फटाक्यांची आतिशबाजी झाली. या शुभवार्तेने पुसदमध्ये दिवाळी साजरी झाली. सर्वत्र स्वागत झाले. मा.ना. शरदरावांनी आपला वारसा म्हणून त्यांची नेतेपदी निवड केली. त्या नेतृत्वाचे सर्व स्वरातून स्वागत झाले. १७ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्विकारला.
१९६२ मध्ये चिनने भरतावर आक्रमण केले. तेवहा मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या रुपाने महाराष्ट्राचा सह्याद्री उत्तरेच्या हिमालयाच्या रक्षणासाठी धावून गेला. त्यावेळी त्यांनी मा. वसंतरावजी नाईक यांच्या स्वाधीन महाराष्ट्र केला आणि त्यानंतर मा. याशवंतरावजींचे मानसपूत्र श्री. शरदराव पवार आपल्या छातीचा कोट करून हिमालयाचे रक्षण करण्यासाठी दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेलेत. त्यांनी आपले वारस मा. सुधाकररावांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या नेतेपदाची माळ घातली हा अपूर्व योगायोग आहे. मा. सुधाकरराव हे अत्यंत मोकळ्या मनाचे नेते होते. त्यांच्या ह्रदयाला आणि कार्यालयाला कडी-कोंडा नव्हता. त्यांह्रदय आणि कार्यालय सदैव खुले होते. जनतेची दुःख वेदना ते सहज ऐकुण घेत असत व त्यावर मायेची फुंकर घालत. मा. सुधाकरराव हे मितभाषी, तोलून-मापून शब्द वापरणारे असले तरी त्यांचा स्वभाव मिश्किल होतो. ते विनोदी हजरजबाबी व समयसुचक होते.
श्रमशक्तीतुन ग्रामविकास, सहकारी चळवळीतून नवी तिर्थक्षेत्रे, त्यामाध्यमातून श्रम व भांडवलाच्या निर्मितीचे नवे लक्ष, समाजवादी अर्थरचनेत देखील खाजगी भांडवलांच्या व कौशल्याचा रस्ते व विजनिर्मितीसाठी वापर आणि या सर्व माध्यमातून विकास कार्याची गरुडझेप त्यासाठी दुर्दम्य आत्मविश्वास कार्य यशस्वी करण्याची आत्यंतिक जिद्द आणि हे सर्व करित असतांना समाजभिमुख धोरण यामुळे व महाराष्ट्रात जलसंधारण, पाणी अडवा व पाणी जिरवा ही योजना भविष्याची जाण ठेवून काटेकोरपणे राबविली. ते सांगत जर आपण असे केले नाही तर महाराष्ट्राचे पुढील १५ वर्षात वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा एक-एक थेंबही वाहून जाता कामा नये त्याला जिरवा असे ते नेहमी आपल्या भाषणातून सांगत. आपल्या राज्याला संमृध्द करायचे असेल तर ते पाण्याशिवाय होणार नाही. कृषी क्षेत्र संपूर्ण पाण्यावर अवलंबून आहे. त्या दृष्टीने त्यांनी अनेक योजना अमलात आणल्या आणि हरीत क्रांतीत भर पडली. त्याचबरोबर महाराष्ट्रात विशेषता मुंबईत अराजकता माजली होती. भुखंड अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाराष्ट्राला एक नविन दिशा दिली. त्याची कारकिर्द २५ जुन, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ अशी फार काळ नव्हती. परंतु अल्पवधीत त्यांचे व्यक्तीमत्व तेजस्वी, विलोभनीय आणि आकर्षक होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले. त्यांनी शासन व प्रशासन ह्या दोन्ही गोष्टी अभ्यापुर्ण हाताळल्या. अशा या नेत्यांच्या आठवणी महाराष्ट्रातील जनता कदापीही विसरणार नाही.
किती आठवावी तुझी भव्य मुर्ती | किती आठवावी तु-ाी दिव्य किर्ती ||
येथे जन्मुनी धन्य आम्हास केले | जल संधारणाचे मंत्री आम्हास दिले ||
जगी आज होई तुजी स्वप्न पुर्ती | किती आठवावी तुझी दिव्य किर्ती ||
सौजन्य-: गोर कैलास डी राठोड