“वडील: एक आधारस्तंभ”


वडील : एक आधारस्तंभ

                    

      जिच्या डोळ्यातून मायेचे , आनंदचे अश्रू वाहतात ते म्हणजे आईचे हृदय अन ज्याच्या डोळ्यात संयम आणि जिद्द ते म्हणजे वडील. खरतर ह्या दोन गोष्टीची व्याख्या करणे खूप कठीणच आहे. खरेतर कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा आईकडेच जीव असतो पण त्या जीवामध्ये वडिलांच्या प्रेमाचे बीज असते. आजपर्यंत अनेक कवींनी किंवा लेखकांनी आईबद्दल बरच लिहिले आहे. पण हा लेख वडील म्हणजे काय असतात हे अधरेखित करतो. मग वाचा हा लेख आणि तुम्हाला आवडला तर जरूर कळवा मला.         

          वडील ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे जो आई ह्या शब्दाइतकाच गहन आहे. आयुष्यात आई प्रमाणे वडिलांना तितकेच महत्त्व आहे. जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटाला सामोरे जाणारे वडील हे आई इतकेच दैवत आहे. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून मुलांचे हौस भागवणारे असे वडील. तर मुलांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारे वडील. कोणत्याही परिस्थितीतून किंवा संकटातून घराला सावरणारे वडील. मुलामुलींच्या लग्नासाठी धडपडणारे हे फक्त वडीलच. ह्या सगळ्यात आईची साथ पण त्यांना तितकीच महत्वाची असते.                                                                                  आपला मुलगा किंवा मुलगी महागड्या सलून/ पार्लर मध्ये जातात हे माहीत असते पण त्यांच्या गालावर वाढलेली दाढी धखवत असते त्यांची खरी काटकसर. मुलांना, बायकोला ते नवीन कपडे,साडी  घेऊन देतील पण स्वत: मात्र जुनाच पॅंट शर्ट घालतील. कशासाठी करत असतात हे सगळं ते घरासाठीच ना? त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न असते की माझा मुलगा किंवा मुलगी मोठे होऊन सुखी समाधानी व्हावेत ह्यासाठीच ते स्वत:ची परवड करून घेत असतात. घरात एखादे भांडण झाले तर वडीलच माघार घेणार त्यांना माहीत असते की आपल्या शिकणार्‍या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत/असावेत. मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न , घरातील आजारपण हे न थकता ते पार पडत असतात. हे पार पडत असताना ते आजारी पडले तरी लवकर दवाखान्यात जाणार नाहीत कारण त्यांना भीती असते की डॉक्टरानी महिनाभर विश्रांती घेण्यास संगितले तर ………………….         

                     आपणास रस्त्यात चालताना एखादी ठेच लागली किंवा रस्त्यात पडलो तर आपण लगेच “ आई ग !!” असे म्हणतो. पण रस्त्यातून जात असताना अचानक मागून येणार्‍या ट्रक ने अचानक ब्रेक दाबला तर आपण “ बापरे !” असे म्हणतो. सांगायचा मतितार्थ येवढाच की मोठे संकटाला आपण नेहमी वडिलांचा धावा करतो. मुलांचा निकाल आणण्यासाठी वडिलच मुलांबरोबर जाणार. कितीही मार्क पडले तरी मिठाई पेढ्याचे बॉक्स घरी असणारच. वडिलांच्या तीक्ष्ण आणि धरधर नजरेपुढे कुठलीही वाईट प्रवृत्ती घराकडे डुंकून सुद्धा पाहत नाही. म्हणूनच मी म्हणतो ,

वडिलांचा पाया + आईसारखे दैवत असलेले मंदिर = आनंदी घर

आईचे वास्तल्य + वडिलांचे प्रेम = मुलांवरील संस्कार

आईची साथ + वडिलांचे धैर्य = संटकाशी सामना

 तर दोघांना एक्मेकांची साथ हाच खरा संसार 

~गोर कैलास डी राठोड 

सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई

मो.9819973477