औरंगाबाद येथील ‘विकासाचे महानायक’ वसंतराव नाईक साहेब यांच्या नावाने असलेली ‘वसंतराव नाईक इंस्टिट्यूट फॉर ट्राईबल डेव्हलपमेंट (VNITD)’ या 22 हेक्टर 96 र जागेसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काल दि.19 ऑक्टोम्बर रोजी समाजासाठी एक आशादायी निकाल दिला आहे……नजिकच्या भविष्यात आपल्या बंजारा समाजाच्या ‘विकासाचे केंद्रबिंदु’ बनू शकणाऱ्या या संस्थेच्या जागेची ‘वसंतदादा पाटिल शुगर इंस्टिट्यूट(VDPSI)’, मांजरी ता. पुणे ला परस्पर विक्री करणाऱ्या ‘तथाकथित जेष्ठ साहित्यिक’ श्री मोतिराज राठोड (अध्यक्ष) व सुरेश पूरी(सचिव) यांच्या विरुद्ध फसवणुकीच्या गुह्यखाली लावलेल्या 420, 406, 408, 467, 471, 34 भा द वी 66 (अ), 67 बॉम्बे ट्रस्ट एक्ट इ.कलमानुसार गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात त्यांनी मागितलेली अटकपूर्व जामीन माननीय उच्च न्यायालय, औ’बाद खंडपिठाने रद्दबातल ठरवला आहे व त्यांना पुढील 8 दिवसात न्यायालयास शरण येण्यास सांगितल्याचे कळाले आहे.सविस्तर बातमी अजुन येणे आहे….!!!”
Tag : Vasantrao Naik Institute for tribal Development ( VNITD), Aurangabad