बंजारा समाजाची नांदेड मनपाकडे मागणी
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील वसंतराव नाईक चौकात हरित क्रांतीचे जनक कै.वसंतरावजी नाईक यांचा पुतळा उभा करण्यात आला होता. मागील बरेच वर्षापासुन नागार्जूना हॉटेल समोर, वसतराव नाईकांची पाटी लावली असून दरवर्षी त्या ठिकाणी सर्व समाजातील वसंतप्रेम जनता पुण्यतिथी व जयंती साजरी करत आहे. त्या करिता आमरण उपोषण, मोर्चे निवेदन देवून सुध्दा शासन दरबारी दखल घेण्यात जात नाही, महानगरपालिका, जिल्हाधिकरी आणि पालकमंत्र्यांनी लेखी ओशासन देवून सुध्दा पुतळ्याकरीता जागादेण्यात येत नाही.
वसंतराव नाईकांचा पुतळा महानगरपालिकेने सहा महिण्यापुर्वी आपल्या ताब्यात घेतले असून आजही ते अंधार कोठडीत आहे. त्यावर धुळ साचत असून सदरील पुतळ्याची विटंबना होत आहे. सदरील पुतळा महानगरपालिकेच्या ताब्यातून व कस्टडी मधुन मुक्त करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. पुतळा कृती समितीच्या वतीने मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महत्वपुर्ण बैठकीस समस्त वसंतप्रे ाr जनतेने उपस्थित राहून मार्गदर्शन करावे असे आवाहन वसंतराव नाईक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बी.डी.चव्हाण, भारतीबाई पवार, रामराव राठोड भाटेगांवकर, प्रकाश राठोड, कैलाश राठोड, श्रध्दा चव्हाण, साहेबराव चव्हाण, रमेश राठोड, एन.पी.पवार, आर.एस.राठोड, सुनिल राठोड (नायक), संजय राठोड, मारोती चव्हाण व गोरबंजारा तिज उत्सव समितीचे सर्व सदस्यांनी आवाहन केले आहे.