‘विकासाचा महामेरू नामदार संजयभाऊ राठोड’

MLA Sanjay Rathod

MLA Sanjay Rathod

सुजलाम सुफलाम असलेला आणि अनेक साधू संत व थोर पुरूषांच्या पद स्पर्शानं पावन झालेला आपला भारत देश.आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळून 67 वर्षाचा काळ उलटला तरी अजूनही काही भागांत सोईसु वधांचा अभाव आहे.या देशाच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्र राज्य,या राज्याच्या पूर्व सिमांतर्गत असलेल्या विदर्भ प्रांतातही सोईसु वधांचा वानवाच.म्हणूनच मराठी माणसांपुढील भौतिक समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या सिंहाची 1966 साली ‘शिवसेना स्थापनेची’ एक सिंव्ह गर्जना झाली.याच शिवसेच्या छावणीतून अनेक वाघांचा जन्म झाला.त्यांपैकीच एक ढाण्या वाघ म्हणजे संजय दुलीचंद राठोड.शिवसेना पक्षासाठी संजुभाऊंनी आपलं संपूर्ण आयुष्य अ ा o व ा ळ y न टाकलं.विदर्भाध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी जमीनआसम ान एक केलं.भाऊंच्या रूपानं विदर्भातील या अंधकारमय भागाच्या क्षितीजांवर एका नवीन सूर्याचा उदय झाला.आणि त्या तळपत्या सूर्याच्या उदयाने या भागातील जनजीवन उजळून निघाले. संजुभाऊंचा जन्म 30 जून 1971 साली विदर्भातील जिल्हा यवतमाळ,तालुका कळंब मधील ‘पहूर’या गावी झाला.देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहारापासून सु ारे 700 किलोमिटर लांब असलेल्या या भागातील सोयीसु वधाही कोसो दूर होत्या. लहानपणापासूनच ही खंत भाऊंना जाणवत होती.सर्वत्र बरबटलेलं राजकारण,भ्रष्टाचार,दुष्काळ,पायाभूत सोयीसु वधांचा अभाव आणि लोकांचे हलाकीचे जीवन यामुळे भाऊंचे मन अंतर्बाह्य ढवळून निघाले.देवात माणूस आणि माणसात देव शोधणारा आपला समाज.परंतु जनता हीच आपली देवता आहे असं मानून स्वःची वज्रूठ आवळून भाऊंनी जनसेवेला सुरूवात केली.ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोणाचार्यांना आपले गुरू मानून धनुष्यबाण उचलला त्याच प्रमाणे कोणाचेही पाठबळ आणि कोणीही गॉडफादर नसतांना संजुभाऊंनी बाळासाहेबांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला डोळयांसमोर ठेवून जनसेवेचा शिवधनुष्य हाती घेतला आणि जनसेवेच्या अग्नीकुंडात स्वतःला झोकून दिले.दिवसेंदिवस भाऊंचा जनसंपर्क वाढत गेला तसाच जनतेचा त्यांच्यावरील विश्वासही वाढत गेला.जनता भाऊंना आपला आधार मानू लागली.भाऊंच्या कीर्तीचा नगारा आसमंतात दूमदुमू लागला.आणि हाच आवाज थेट बाळासाहेबांच्या कानावर जाऊन धडकला.वाघाची जागा बिळात नसून आपल्या छावणीत आहे याची जाण असलेल्या साहेबांनी या हिर्याला पैलू पाडण्याचे काम केले आणि विधानसभा लढविण्याचा आदेश दिला.बाळासाहेबांच्या आदेशावरून या ढाण्या वाघानं विदर्भातील नेर,दारव्हा,या दुर्लक्षित मतदार संघाकडे गरूड झेप घेतली.काँग्रेस मध्ये प्रशस्तप्रस्थ असलेल्या माननीय माणिकराव ठाकरे साहेबांच्या विरोधात इ.स.2004 साली आपल्या आयुष्यातील पहिली विधानसभेची निवडणूक लढविली आणि नेर व दारव्हा येथील मतदार राजांनी त्यांना भरघोष मतांनी विजयी करून आमदार म्हणून निवडून दिले.तर इ.स.2009 मध्ये नेरदारव्हा हे मतदार संघ ‘दिग्रस’मतदार संघाला जोडल्या गेले.या मतदार संघात राज्यमंत्री असलेले माननीय संजय देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी सामोरे जावे लागले.दिग्रसदारव्हानेर येथील जनता जनार्दन असलेल्या मतदार बंधुभ गनीं सोबतच लहानथोर मंडळींनी खारीचाच नव्हे तर सिंव्हाचा वाटा उचलून संजुभाऊ राठोड यांना दुसर्यांदा आमदार म्हणून भरघोष मतांनी विजयी केले.सर्वधर्म समभावाची कास अंगी असलेले संजुभाऊ आपल्या मतदार संघातील जनतेच्या गळयातील जणू ताईत बनले म्हणूनच इ.स.2014 मध्ये दिग्रसदारव्हानेर येथील मतदार महोदयांनी त्यांना महाराष्ट्र राज्यातून दुसर्या क्रमांकाने तिसर्यांदा आमदार म्हणून विजयी करून ‘विजयाची हॅट्रीक’नोंदविली.त्यामुळेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व ज्येष्ठ पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये ‘महसूल राज्यमंत्री’ महणून संजुभाऊंच्या नावाची शिफारस करण्यात आली. शिवसेनेने विदर्भाला योग्य प्रशासन करणारा मंत्री तर दिलाच शिवाय एका नेतृत्त्वधारी नामदाराची निवड करून बंजारा समाजाला यथोचित न्याय दिला.शुक्रवार 5 डिसेंबर 2014 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ विधान भवन प्रांगण,मुंबई येथे पार पडला.त्या ‘शपथविधी सोहळया प्रसंगी’ बंजारा समाजाच्या इतिहासात प्रथमच ‘जय सेवालाल’ हा नारा देऊन भाऊंनी संपूर्ण भारत देशातील बंजारा समाजाचे मन जिंकले.‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हे वर्षानुर्षांपासून राजकीय वर्तुळात चालत आलेले सूत्र मोडीत काढून संजुभाऊंनी ‘समाजकारणातून सत्ता आणि सत्तेतून समाजकारण’ हे सूत्र प्रस्थापीत केले. भाऊंची कारकीर्द लिहून काढायची झाली तर त्याचा एक मोठा ग्रंथच तयार होईल.सलग 10 वर्षाच्या आमदारकीच्या कारकीर्दीत त्यांनी कुणाही आमदाराला लाजवेल अशी कामगिरी केली आहे.संजुभाऊंनी चांगले रस्ते,पाणी,वीज,आरोग्य,शिक्षण आणि सर्व समाजातील बांधवाच्या मुलभूत समस्या सोडवल्या.निवडून आले की पाच वर्षे आपल्या मतदार संघात तोंड न दाखविण्याच्या कित्येक आमदारांच्या सवयी आहेत.परंतु संजुभाऊ मात्र मतदार संघातील जनतेच्या कायम संपर्कात राहता यावं,त्यांच्या अडीअड चणी समजून घेता याव्यात आणि त्यांना मदतीचा हात देता यावा म्हणूनच आठवडयातील प्रत्येक गुरूवारी दिग्रस,शुक्रवारी दारव्हा,शनिवारी नेर तर सोवारी यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून जनता दरबार भरवतात. जनतेच्या बहुतांशी समस्या आणि तक्रारी समजून घेऊन सोडवतात.वयस्कर माणसं तर संजुभाऊंना आपल्या मुलासमान मानतात.आणि संजूभाऊ देखिल मुलासारखीच त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य समजतात.पूर्वी मतदार संघातील जनतेला डोळयाचा कोणताही आजार झाल्यास तालुका किंवा जिल्हयाच्या ठिकाणी धाव घ्यावी लागायची परंतु आता मात्र संजूभाऊंच्या पुढाकारानं प्रत्येक वर्षी बहुतांशी गावखेडय ांध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले जाते.जिल्ह्याचे तज्ञ डॉक्टर या शिबीरात येतात.गावोगावी भरविण्यात येणार्या शिबीरांधून हजारों रूग्णांची तपासणी केली जाते.त्यांना औषधं आणि आवश्यकतेनुसार चष्माही दिला जातो.ज्यांच्या नेत्रांवर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे अशा रूग्णांना खेडयांतून तालुक्यात,जिल्ह्यात तर काहींना नागपूर,सावंगी,सेवाग्राम येथे घेऊन जातात आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडले जाते.विशेष म्हणजे हे सगळे काम अगदी मोफत केले जाते.यासाठी भाऊंनी अनेक ऍम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तसेच मुंबई येथील अलियावर जंग विकलांग प्रवण संस्थेच्या आणि संजूभाऊच्या पुढाकाराने दरवर्षी मतदार संघातील शेकडो अपंगांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते साहित्य मोफत वाटप करण्यात येते.भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्के जनता ही 35 वर्षा खालील आहे.त्यांच्यासाठी भाऊंनी विशेष योजना राबवल्या आहेत.गरीब आणि गरजू विदयार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च तर भाऊंनी उचललाच आहे शिवाय बाहेरून शिकायला आलेल्या विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी तसेच विदयार्थीनींसाठी प्रशस्त आणि सोईसु वधांनी युक्त असे शासकीय वसतिगृह बांधण्यासाठी विशेष पाठपुरावा केला आहे. दरवर्षी भाऊंकडून शालेय विदयार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप केले जाते.तसेच गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरविलेही जाते.आपल्या मतदार संघातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून नेर व दिग्रस येथे भाऊंच्या पुढाकाराने भव्य क्रीडांगण उभारण्याचे काम सुरू आहे.याच मैदानात घाम गाळून अनेक युवा खेळाडू पुढे आपल्या मतदार संघाचे आणि देशाचे नाव मोठे करतील अशी संजूभाऊंची अपेक्षा आहे.सध्या दारव्हा येथे भव्य उद्यान उभारण्याचे काम सुरू आहे.यामध्ये जॉगर्स पार्क,तलाव,बसण्यासाठी बाक,विसावण्यासाठी सिमेंटच्या झोपडया,पिण्यासाठी पाणी आणि शौचालयाची व्यवस्था केलेली आहे.या उद्यानात मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळाचे साहित्य असल्यामुळे मुले स्वच्छंदपणे खेळतात,तसेच तरूणतरू णी आणि वयोवृद्ध माणसे सकाळस ंध्याकाळ फिरायला येतात आणि आपल्या दैनंदिन ताणतणावातून मुक्त होतात. या उद्यानाची निर्मिती करण्यासाठी भाऊंनी शासनाकडून करोडों रूपयांचा निधी मंजूर करून आणला असून दारव्हा येथील जनता या उद्यानाचा मनसोक्त आनंद घेतात.आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून झालेले आणखी एक उल्लेखनीय कार्य ‘मोक्षधाम’ म्हणजेच स्मशानभू ाr.या स्मशानभू ाrच्या भयान आणि भकासपणां wळे तिच्या आसपासही फिरकण्याचं टाळले जात होते.जनतेच्या या विचारसरणीला बदलण्यासाठी त्यांनी या जागेला पवित्र आणि नयनरम्य बणविण्याचा निर्णय घेतला.भाऊंच्या या वेगळया पद्धतीच्या विचारसरणींमुळे स्मशानभूमिचे रूपांतर मोक्षधामात झाले.आपल्या मतदार संघातील तिनही तालुक्याच्या ठिकाणी या मोक्षधामाचे सौंदर्यीकरण करण्यात आले.शहरातील इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीतून या विकासपुरूषाची दूरदृष्टी आपल्याला दिसते.ज्यामध्ये गावखेडय ांना आणि शहरांना जोडणारे रस्ते,दिग्रस शहरातील आर्णीकडे जाणार्या रस्त्यावरच्या भव्य पुलाचे बांधकाम,आर्णी आणि पुसद रोडला जोडणारा बायपास मार्ग ही उल्लेखनीय कार्य तर आहेतच.याशिवाय दिग्रस शहरातील ‘माणूसमार्या पूल’ हा नावाप्रमाणेच मृत्युचा सापळा बनला होता.परंतु संजूभाऊंच्या अथक प्रयत्नांनी या पुलाच्या बाजूलाच नवीन सुरक्षित पूल उभारणीचं काम सुरू झाले आहे. बाळासाहेबांचा आदर्श आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेत्तृत्वां सोबतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते साहेबांच्या मार्गदर्शनाने संजूभाऊंचे समाजसेवेचे काम अखंडपणे सुरू आहे.भारताच्या सर्वोच्च शिखराच्या उंचीलाही ठेंगणं करू शकणार्या भाऊंच्या समाजसेवेच्या तेजोवलयचा कळस आपणांस पाहावयाला आणि अनुभवायला मिळतो तो यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूलाच मोठया दिमाखात उभारलेल्या मातोश्री प्रतिक्षालयात.असं म्हणतात जिसका कोई नहीं,उसका खुदा है यारों.याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तो मातोश्री प्रतिक्षालयात.म्हणूनच या प्रतिक्षालयाला आरोग्य मंदिराची उपमा दिली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.माननीय रावते साहेब आणि संजय राठोड साहेब यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून सुसज्जपणे उभारलेल्या मातोश्री प्रतिक्षालयात रूग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वच्छ जागा,पिण्यासाठी थंड पाणी,करमणुकीसाठी टी.व्ही.,इमर्जन्सी सेवेसाठी ऍम्बुलन्स या शिवाय सेवाभावी कार्यकर्ते उपलब्ध असतात.एखादया हॉस्पिटलमधील एखादया रूग्णाकडे दुर्लक्ष होत असेल,एखादयाला रूग्णालयात दाखल करून घेण्यात येत नसेल,कोणाला रक्ताची आवश्यकता असेल, कोणा अपंग व्यक्तिला दाखला पाहिजे असेल,एखाद्या गरीब रूग्णाला औषधांची गरज असेल अशा अनेक अडचणी घेऊन रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येतात.24 तास रूग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांकडून आलेल्या रूग्णांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची प्रथम नोंदणी केली जाते नंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार सेवा दिली जाते.प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील शेकडो लोक या मातोश्री प्रतिक्षालयातर्फे पुरविल्या जाणार्या सेवेचा लाभ घेतात.संजुभाऊंच्या या महान सेवाभावी कार्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून भाऊंना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतात. गरीब रूग्णांना सहजपणे रक्त उपलब्ध व्हावे,त्यांना रक्ताची अडचण भासू नये म्हणून दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘माँ आरोग्य सेवा समिती’ आणि शिवसेनेच्या वतीने यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.मतदार संघातील जनतेबद्दल अभिमान बाळगण्याची शिकवण भाऊंच्या गटप्रमुख मेळाव्यातून दिसून येते.जनता आपल्यासाठी नसून आपण जनतेसाठी आहोत,जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून जनतेची कामे केली पाहिजेत.त्यांच्या सुखदुः खात सहभागी झाले पाहिजे.भाऊंनी आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावात वसलेल्या जनतेपर्यंत सेवा पुरविण्यासाठी गावागावातून गटप्रमुख तयार केले असून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करतात. गटप्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते भाऊंप्रमाणेच जनतेच्या आदेशाचे पालन करण्यास सज्ज असतात.मतदार संघातील कोणतीही व्यक्ती भाऊंना सहज भेटून आपली अडचण सांगू शकते.जनता दरबार असो,भाऊंचे कार्यालय असो वा राहतं घर असो.या ठिकाणी जर भाऊंची भेट झाली नाही तर मग मतदार संघाच्या रस्त्यावर प्रवासाला निघालेल्या त्यांच्या गाडीला कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तिने थांबण्यासाठी हात केला तर भाऊंची गाडी थांबलीच म्हणावी. त्या व्यक्तिचे संपूर्ण म्हणने ऐकून घेतल्याशिवाय आणि त्यांच्या समस्येचे निरसन केल्या शिवाय भाऊंची गाडी पुढील प्रवासासाठी निघत नाही.मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी ज्या नेत्याची गाडी थांबते,त्या नेत्यांची राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील गाडी,जनता कधिही थांबू देत नाही तर सदैव पुढे पुढे घेऊन जाते. नेता असा असावा,ज्याला जातीधर्मापेक्षा माणुसकीच्या धर्मावर गर्व असावा.हाच प्रत्यय संजुभाऊंच्या वर्तणुकीतून आणि त्यांच्या कामातून वारंवार दिसून येतो.विकासकामाच्या चढत्या आलेखाचे जीतेजागते उदाहरण संजुभाऊंनी महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवले आहे.दारव्हा येथील आय टी आय कॉलेज अथवा न्याय मंदिराची शासकीय इमारत असो,दिग्रस येथील प्रशासकीय भवन असो किंवा मुलींचे शासकीय वसतिगृह असो,तर नेर येथील नगरपरिषद इमारतिच्या बांधकामाची मंजुरी आणि करोडों रूपयांचा निधी असो अथवा घन कचरा डेपोच्या कामाची मंजुरी आणुन प्रत्यक्ष त्याची उभारणी करणे असो भाऊंनी या सर्व प्रशासकीय कामात अधिक लक्ष घालून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्याचप्रमाणे आपल्या आमदार निधितून अनेक ठिकाणी उभारलेले प्रवासी निवारा,अनेक ठिकाणी उभारलेले भक्त निवास,दिग्रस येथील भवानी टेकडी जवळच्या सभागृहाचे बांधकाम आणि संरक्षण भिंतीचे काम,उत्तरवाढोणा येथील सामाजिक सभागृह,मुंगसाजी महाराज धामणगाव देव व शिरजगाव पांढरी येथील चिंतामणी देवस्थान खोंडया बरड,उद्धव बाबा देवस्थान माणकी,शिवाजी नगर नेर येथील सभामंडप आणि श्री फकिराजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथील भक्त निवास उभारणीसाठी लाखों रूपयांची तीर्थक्षेत्र विकास निधीची मंजुरी,पर्यटन विकास अंतर्गत कामे आणि त्या संबंधीत निधिची मंजुरी.नेर येथील वाणी समाजाच्या दफनभूमिचे काम तसेच मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानाच्या भव्य जागेसाठी लाखो रूपयाचा निधी मंजूर करून आणणे.संजू भाऊंच्या अशा अनेक कार्यांची मालिकाच दिसून येते.भाऊंनी सर्व समाजात एकात्मतेची भावना टिकविण्यासाठी अनेक सार्वजनिक कार्यक्रम राबविले. सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले जाते. तरूणांईंच्या मनात सार्वजनिक उपक्रमांचा उत्साह वाढविण्यासाठी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करतात.तर लहानम ाoठया मुलांच्या मनात सांस्कृतिक कला जोपासण्यासाठी नृत्याचे कार्यक्रम घेतले जाते.माननीय बाळासाहेबांचा आदर्श घेऊनच संजुभाऊंनी जनतेच्या हृदयात देशाभिमानाची भावना जागृत करण्यासाठी नेर,दारव्हा,दिग्रस येथे ‘भारत माँ की आरती’ या कार्यक्रमाचं आायोजन केले.तर शिवसेनेच्या चैतन्याची ज्योत संपूर्ण जनसमुदायांमध्ये पसरविण्यासाठी बुलेट रॅलीचे आयोजन केले.शेकडो शिवसैनिकांचा ताफा घेऊन निघालेल्या या भाऊंच्या रॅलिला प्रचंड प्रतिसाद मिळाला.‘केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे’ या म्हणी प्रमाणे भाऊंनी स्वखर्चानं पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित केले.तरूण बेरोजगार युवकांसाठी आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सहकारी तत्त्वावर किंवा खाजगी स्तरावर एखादा उद्योग ऊभा करावा असा भाऊंचा मानस आहे.शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने करणे,घेराव घालणे आणि मोर्चे काढणे हे काम सातत्याने संजुभाऊ करत आले आहेत. जनतेच्या नजरेत अनेक प्रकारची कामे करून आपल्या मतदार संघाचा कायापालट करणारा नेता हा खर्या अर्थाने जेता आहे.आणि हा जेता मतदार संघातील दुःखीतांचा कैवारी आहे. वयोवृद्धांचा मुलगा आहे तर प्रत्येक तरूणतरू णींचा भाऊ आहे.गरीब असाह्य विद्यार्थ्यांचा पालक आहे तर दुर्बलांचा रक्षक आहे.संजुभाऊ म्हणजे 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करणार्या शिवसेनेचे पाईक आहेत.प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आपल्या मतदार संघातील जनतेच्या अन्याय अत्याचारासाठी लढणारे,सदैव समाजसेवेसाठी तत्पर असणारे आणि आपल्या कार्यकु शलतेची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर फडकवणारे असे आपले कार्यसम्राट,विकासाचा महामेरू माननीय नामदार संजयभाऊ राठोड ‘महसूल राज्यमंत्रीम हाराष्ट्र राज्य’यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस सर्व जनतेसह माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांनी गुरूवार दिनांक 5 डिसेंबर 1963 रोजी शपथ ग्रहण करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन सर्वात जास्त वर्षे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याचा इतिहास नोंदविला,नाईक साहेबांच्या राजकीय आदर्श व्यक्तिमत्वाचा हाच इतिहास पुढे संजुभाऊंच्याही वाटयाला यावा तसेच बंजारा समाजाच्या या खर्या नेतृत्त्वधारी हिर्याची राजकीय कारकीर्दिची ज्योत अशीच तेवत राहावी यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सेवालाल!

c k pawar