नागपुर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून प्रवाहाबाहेरच जीवन जगणारा न्यायवंचित विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार संवदेनशीन नसल्याने प्रचंड असंतोष विमुक्त भटक्या समाजामध्ये खदखदत आहे. विमुक्त भटक्या समाजाच्या विकासासाठी शिफारस करणार्या विविध आयोगापैकी एकही आयोग 67 वर्षात कोणत्याही सरकाराने मंजूर केले नाही. यापैकी कोणते दुसरे दुर्दैव असू शकते. अच्छे दिन यावे यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महसूल राज्यमंत्री संजयभाऊ राठोड यांना साकडे घालण्यात आले. विमुक्त भटक्या समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत वसंतराव नाईक पंचायत राजच्या शिफारसीनुसार आरक्षण देणे. प्रत्येक तांडा, पाल, बेडय़ाना महसुलीचा दर्जा देऊन ग्रामपंचायती निर्माण करणे. विमुक्त भटक्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथील बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्रपणे वसंतराव नाईक यांच्या नावाने संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणे. प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर स्वतंत्रपणे विमुक्त भटक्या जातीसाठी वस्तीगृह उभारणे. पदोन्नतीमध्ये पूर्ववत आरक्षण लागू करणे. सरकारी नोकरीमधील अनुवेश भरुन काढणे, वसंतराव नाईक यांचे भव्य राष्ट्रीय दर्जाचे मुंबई व नागपूर येथे स्मारक उभारणे व कृषिदिनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे, विमुक्त भटक्यासाठी स्वतंत्र घरकुल योजनेची मोहीम आखणे, आर्थसंकल्पात स्वतंत्रपणे विमुक्तांसाठी भरीव तरतूद करणे. एस.सी., एस.टी. प्रमाणे सर्व सोई सवलती विमुक्त भटक्यांना लागू करणे, तांडा वस्ती सुधार वा योजनेसाठी 1000 कोटीची तरतूद करणे, विमुक्त भटक्यातील भूमिहीनांना शेतजमीन योजना लागू करणे. आदि महत्वपूर्ण मागण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व संजयभाऊ राठोड महसूल राज्यमंत्री यांना आमदार हरिभाऊ राठोड, दिनानाथ वाघमारे, मोहन चव्हाण, एकनाथ पवार, मुकूंद अडेवार, राजेंद्र बठीये, अशोक पवार, मतीन भोसले, राजू चव्हाण, सदाशिव हिवलेकर यासह शेकडो कर्मचार्यानी फडणवीस सरकारच्या मंत्र्याला साकडे घालून न्यायवंचित विमुक्त भटक्याला न्याय देण्याची मागणी केली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व संजयभाऊ राठोड महसूल राज्यमंत्री यांनी विमुक्त भटक्याच्या झोपडीत अच्छे दिन येईल असे ओशासन दिले. विमुक्त भटक्यांनी अजून किती दिवस न्यायवंचित राहायचे किती वर्षे मोर्चे काढून केवळ ओशासन पदरी पाडायचे असा संतप्त सवाल आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला. 5 जानेवारीला मुंबई येथील भव्य मोर्च्यानंतर प्रश्न मार्गी न लागल्यास लढा अतिशय तीव्र करण्याचा इशाराही यावेळी हरिभाऊ राठोड यांनी दिला.