विश्व बंजारा दिवस… 08 एप्रिल

World Banjara Day 8 April

आज विश्व बंजारा दिवस… मित्रांनो 08 एप्रिल 1981 रोजी जर्मनीमधे रोमा ,जिप्सी आणि विश्व बंजारा समाजाची बैठक झाली होती. या बैठकीमधे भारताकडुन स्व. रामसिंगजी भानावत आणि स्व.रणजीत नाईक यांनी भाग घेतला होता. बंजारा समाज एकता आणि रोमा प्रश्नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त रोमा समुदायाविषयी भेदभाव व मानवाधिकार हनन या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दरवर्षी 08 एप्रिल हा दिवस विश्व रोमा बंजारा दिवस म्हणुन साजरा करण्याचे ठरले. रोमा लोक भारताचे मुळ रहीवाशी असुन ते मुळचे बंजारा आहेत. 6व्या शतकापासुन 11 व्या शतकापर्यंत ते भारतातुन अफगानिस्तान मार्गे युरोपमधे गेले असल्याचे मानले जाते. यूरोप मधिल विविध देशात रोमा बंजारा समाजाची लोकसंख्या दोन कोटीपेक्षाही अधिक आहे. रोमानी भाषा हिंद आर्य भाषा गणातिल असुन बंजारा,गुजराती,राजस्थानी भाषेतिल अनेक शब्द या भाषेमधे आहेत.

World Banjara Day 8 April

Center for secular and moliculer Biology institution Hyderabad या संस्थेचे senior Scientist डॉ. निरज रॉय यांच्या नेत्रुत्वाखाली जगातिल अनेक विश्वविद्यालयाच्या Scientists नी पूर्व युरोपमधिल रोमा लोकांची D. N. A. चाचणी केली असता भारतीय बंजारा, शिकलीगार या समाजाशी साम्य आढळले. युरोपमधिल रोमा बंजारा लोकांनी नाझीकडुन (हिटलर) 1938 मधे ‘जिप्सी क्लिनअप विक ‘राबविण्यात आले. दुसर्या महायुद्धाच्या काळात या समाजाला लक्ष करण्यात आले होते. युद्धकाळात त्यांना विशिष्ट शिबिरामधे कैदेत ठेवण्यात आले. स्त्रीयां, बालक, माणसे यांना नामोहरम करण्यात आले. उपासमार आणि भुखबळीमुळे 20,000 रोमा बंजारे म्रुत्युमुखी पडले. आज रोमा युरोपमधिल सर्वाधिक गरीब, अल्पसंख्याक समुदाय आहे. हे लोक भटके असल्यामुळे इंग्रजीमधे यांना जिप्सी म्हणतात. युरोपमधे या लोकांना नागरीकत्व प्राप्त करण्यात अनंत अडचणी येत आहेत. भेदभाव केला जातो. मानवाधिकार नाकारला जातो. फ्रांसने गेल्या काही दिवसापुर्वी रोमा लोकांना रोमानिया आणि बल्गेरीयामधे हुसकावुन लावले. हा मुद्दा फ्रांसमधिल काही मानवाधिकार संघटनांनी लावुन धरला होता.या समुदायाच्या मानवाधिकार रक्षणासाठी European Roma Rights Center (ERRC) तसेच Roma Rights Network या स्वयंसेवी संस्था युरोपमधे कार्यरत आहेत. युरोपमधे गेल्यानंतर रोमा समुदाय युरोपातिल बायजेंटाईन साम्राज्याचा भाग बनले. हे साम्राज्य स्वत:ला रोमन साम्राज्याचे वारसदार मानतो. म्हणुन या लोकांनी स्वत:ला रोमा हे नांव धारण केले असे मानले जाते. 1983 मधे तत्कालीन पंतप्रधान इंदीराजींनी रोमा महोत्सवात ‘रोमा लोगोंका इतिहास विपत्ति और वेदना का इतिहास है, लेकीन नियत्ती की थप्पेडोपर मानवीय उत्साह का परिचायक है’. बांधवांनो रोमा बंजारा समाज युरोपमधे आजही खुप कष्टप्रद जीवन जगतो. रोमा समुदायाविषयी आपल्या देशातिल बंजारा बांधवामधे अधिक जागरुकता झाली पाहीजे. स्व. रामसिंग भानावतजी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अनेकदा या समाजाच्या मानवाधिकाराबाबत प्रयत्न केले.
अरविंद जाधव माहुर
94034 63176

Tag: Roma Banjara Day, World Gypsy Day, World Banjara Day, Vishva Banjara Divas, 8 April World Banjara Gypsy Day, Gor Banjara Divas, Bhatke Divas