मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई कृषी उत्पन्न बजारा समितीच्या नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळा अंतर्गत विठ्ठल सखाराम राठोड यांची उपसचिव पदी निवड करण्यात आली. व्हि.एस.राठोड हे गेली 25 वर्षे पासुन ह्या बाजार समितीच्या विविध पदावर कार्यरत होते. तर गेली 6 वर्षा पासून ते सहाय्यक सचिव म्हणुन काम पाहत होते.
त्यांच्या ह्या अनुभवी कार्य व त्यांच्या उत्कृष्ठ कामशैलीमुळे बाजार समितीच्या संचालक मंडळा अंतर्गत त्यांची हि निवड करण्यात आली. व्हि.एस.राठोड हे रा.लिंबाळातांडा ता.सेनगाव जि.हिंगोली येथील रहिवाशी असुन ह.मु.नेरूळ, मुंबई येथे स्थानिक आहेत. त्यांच्या ह्या निवडीबद्दल नेरूळ चे नायक पंडित जाधव, कारभारी विनायक राठोड, गणेश राठोड, रामेश्वर चव्हाण, इंजि.किरण चव्हाण, इंजि.मधुकर आडे, सुरेश आडे, रमेश आडे, ऍड.प्रकाश चव्हाण, अविनाश जाधव, अविनाश पवार, परभणीचे अध्यक्ष प्रा.एम.एल.जाधव, आर.के.राठोड, एम.डि.जाधव इत्यादींनी अभिनंदन केले.