बंजारा समाजाचाच नव्हे तर.. संपूर्ण मराठी जनाचा अपमानच म्हणावे..? महानायक वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र घडवीला आणि त्यांची जयंती १ जुलै हा दिवस कृषिदिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो असा अध्यादेश असताना पुन्हा १जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून घोषित करुन ते साजरा करण्यास निर्देश देण्याचा आज दि.२०मे२०१७ रोजी शासन अध्यादेश काढणे हे कितीपत समर्पक आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही सक्षमीकरणासाठी २५ जानेवारी हा दिवस मतदार दिवस साजरा करण्याचा अध्यादेश काढला शिवाय तसा साजरा केला जातो.तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याला या मतदार दिवसाच्या धर्तीवर राज्याने असा दिवस साजरा करावा,परंतु महाराष्ट्र शासनाला १जुलै हाच दिवस कसा काय सापडला..? १जुलै कृषिदिन राज्यात साजरा केला जातो,हे विस्मरण कि लाखो जनाच्या भावनेला ठेच पोहचवण्याचं एक जावई शोध म्हणावे का.? १जुलै ऐवजी शासनाच्या सामान्य विभागाला दुसरा दिवस दिसला नसेल का..? महानायक वसंतराव नाईकाच्या जयंती च्या ऐवजी दुसर्याची जयंती एखादा दिवस साजरा करण्याचा धाडस करता आले असते.?,कि फक्त महानायक वसंतराव नाईक जयंतीचा दिवस दिसला का..?
हा महापुरुषाचा घोर अवमान आहे.शासनाला नम्र निवेदन आहे कि, दि.२०मे चा अध्यादेश रद्द करण्यात यावा.१ जुलै कृषिदिन आहे,कृषिदिन म्हणूनच साजरा व्हावा. महापुरुषाचा अवमान कधिही खपवून घेतला जाणार नाही. यावर कृपया महानायकाच्या अनुयायानी संवैधानिकतेनी आवाज उठवूया.
✍???? एकनाथ पवार,नागपुर .
दि.२०मे२०१७
सौजन्यः गोर कैलास डी राठोड