शिकारी राजा (कवी. निरंजन मुडे)

शिकारी राजा

कार्यकाळ असो मोठा,
वा असो अल्पावधी…
असामान्य कार्याला,
इतिहास विसरत नसते कधी…!

असा एक होऊन गेला,
सुधाकर पर्व…
गोर समाजालाच नव्हे तर,
महाराष्ट्रला असावा त्यांचा गर्व…!

छ.शिवराया प्रमाणे,
लढवय्या कार्य ज्यांनी केले…
माफिया राज नष्ट करून,
गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र दिले…!

वर्षावर साहेबांनी,
सभा बोलावली…
माफिया मुक्त मुंबई करु,
नाईकांनी कबुलीच दिली…!

एका अधिकाऱ्याने,
प्रश्न उपस्थित केला…
साहेब तुम्ही आम्हास,
आदेश जरूर दिला…!

आज म्हणाल पकडा,
अन् उद्या म्हणाल सोडा…
असाच चालू राहील,
सत्ताधाऱ्यांचा पाढा…!

सुधाकर म्हणे मी आहे शिकारी,
अस्स होणारच नाही…
बंदुकीतून सुटलेली गोळी,
परत येणार नाही….!

ज्यांनी गुन्हेगारी,माफीयांची
समुळ नष्ट केले जंत…
त्यास ग्वाही होते,
ब्रिगेडियर सुधीर सावंत…!

म्हणे ब्रिगेडियर अशा योद्धास
मिळावा भारतरत्न,
पण त्यासाठी त्यांचाच समाज,
करत नाही प्रयत्न…!

अशा शिकारी राजाची नोंद,
इतिहासात घ्यावी…
त्यासाठी गावोगावी साहेबांची,
जयंती साजरी व्हावी….!!

कवी
निरंजन मुडे
९०८२१९९८६७