“शिक्षण प्रबोधन”

​!!! शिक्षण प्रबोधन :१ !!!

   शिक्षण हा आपल्याला सुखी बनवणारा एकमेव मार्ग,म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणा बद्दल विशेष काळजी घेतली पहिजे.शिक्षणा विषयी प्रबोधन :-

1)आपलं मूल शिकले पाहिजे याची खरी तळमळ मुलाच्या आई बापाला वाटली पाहिजे.मात्र आपल्या समाजातील पालकांना हे वाटत नाही,कारण शिक्षणा अभावी त्यांना तसं वाटत नाही.परिणामी त्यांना प्रबोधन होणे गरजेचे आहे.यासाठी पालक -शाळा संबध बांधणे महत्त्वाचे आहे.आपले मूल कोणत्या वर्गात आहे आणि त्यानुसार त्याची प्रगती आहे का ?जर नसेल तर त्याला जबाबदार कोण.याविषयी सतर्क राहणे ही बाब समजावण्याचा प्रयत्न करावे लागेल.

2)पालकांना शाळेत काय चाललय हे बघता यावे म्हणून शासनाने खालील पाऊले उचलली आहेत.१)शाळा व्यवस्थापन समिती,यापूर्वी ग्राम शिक्षण समिती होती यात सरपंच व इतर सदस्य असायचे सरपंच अध्यक्ष असायचे त्यामुळे शाळेत राजकारण घुसले हे लक्षात आले म्हणून त्यात बदल करून आता शाळा व्यवस्थापन समिती निर्माण् केली या समितित फक्त ज्यांची मुलं शाळेत आहेत तेच सदस्य असतील याचे कारण शिकणार्या मुलांचे पालकांना शाळेत काय चाललय हे समजावं व त्यांना आपल्या मुलांची प्रगती सातत्याने घेता यावी यांकरीता महिन्यात किमान एक सभा घ्यायची आहे.पण दुर्दैव आमचे शिक्षक हुशार आणि पालक अशिक्षित -अद्न्यान मग काय सांगायचे काय फळ मिळेल हे सांगायलाच नको.याचे प्रबोधन आपल्याला करावे लागेल,मुलं नुसती शाळेत जावून शिकत नाही तर त्याच्या प्रगती विषयक सतत जागृत राहणे गरजेचे आहे.

       जय सेवा लाल !जय वसंत !

रमेश पवार :टिट्वाला

~गोर कैलास डी राठोड

बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,

www.banjaraone.com