नागपूर (प्रतिनिधी) – नूकताच जाहिर झालेल्या 10 वी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत विदर्भातून शिवम जाधव ने 500 पैकी 486 गुण (97.2%) मिळवून विदर्भातून तिसरा आणि राज्यातुन 11 वा तर बंजारा समाजातून प्रथम क्रमाकाने मेरिट उत्तिर्ण झाला आहे. शिवम शशिकात जाधव हा नागपूर येथील भारतीय विद्या भवन्स विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत होता. यापूर्वी त्याने मॅथेथिक ऑलपियाड मुंबई या सेंटरल बोर्डच्या परीक्षेत सुध्दा सुयश मिळविले आहे. शिवम जाधव ने मिळविलेल्या या यशाबद्दल संपूर्ण बंजारा समाजातून व भारतीय विद्या भवन्स नागपूर कडून त्यांचे कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय शिवम जाधवने आपले आई-वडिल डॉ.सौ. सुरेखा शशिकांत जाधव यांना दिले. शिवम जाधव ह्या यशा बद्दल सा. बंजारा पुकार परिवार तर्फे अभिनंदन करण्यात आले.