अथनी देवस्थान देशात गणला जाईल असा विकास करणार – मा.किसनराव राठोड
अथनी (प्रतिनिधी) – बंजारा तीर्थक्षेत्र हमुलाल महाराज संस्थान अथनी येथील बंजारा समाजाचे दुसरे तिर्थक्षेत्र असलेल्या अथनीला 31 मे ला देशभरातून लाखो भक्तांनी दर्शन घेतले. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी येथे संत श्री हमुलाल महाराज यांची समाधी आहे. या ठिकानी तिनशे वर्षापासून दक्षिण भारतातील बंजारा भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र 2004 पर्यंत हे देवस्थान स्थानिक लोकांच्या ताब्यात होते. येथे येणार्या भाविकांची आर्थिक पिळवणूकीसह अनेक प्रकाराने त्रास देत होते. ही माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांना समजल्यावर त्यांनी हस्तक्षेप करून मंदीर आपल्या ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांनी मंदिर विकासाचा ध्यास घेतला मंदिर बांधकामाला सुरूवात केली. सुरूवातील मंदिर परिसरातील जमीन तीन कोटी रूपयाला विकत घेऊन मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. नंतर भक्त निवास बांधून, येणार्या भाविकांची राहण्याची उत्तम व्यवस्था करून दिली. तसेच येणार्या भाविकांना मोफत भोजन व्यवस्था करून दिली. तसेच मंदिराला लागुनच 13 एकर जमीनीवर तीन हजार वृक्षाची लागवड करण्यात आली. आज ती झाडे 20-30 फुट उंचीची झाली आहेत. मंदिर परिसरामध्ये अनेक इमारतीचे बांधकाम झाले असून काही इमारतीचे बांधकाम प्रगती पथावर आहे. मंदिराकडे येणार्या सर्व रस्त्याचे डांबरीकरण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. आणि या ठिकाणी सूंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षापुर्वी मंदिर परिसरात सातीभवांनी (सातही देवींचे मंदिर) मंदिर स्थापन करून बंजारा समाजाला सातही देवीची एका ठीकाणी दर्शन होईल अशी व्यवस्था फक्त अथनी येथेच आहे. यामुळे देशभरातील बंजारा भाविकांची प्रामुख्याने सोय झाली आहे.
251 किलोचा चांदीचा देव्हारा केले अर्पन
संत श्री हमुलाल महाराज यांच्यावर अपार श्रध्दा असलेल्या किसनभाऊ राठोड यांनी हमुलाल महाराज यांची चांदीची मुर्ती व देव्हारा संस्थानला अर्पण केले. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून अथनीयेथे अनेक कामाचे नियोजन केले असून भविष्यात हे ठिकाण देशातील नामांकित देवस्थानाच्या बरोबरीचे होईल असा आत्मवेशास किसनभाऊ राठोड यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलतांना व्यक्त केला.