*गोर बंजारा धर्मगुरू व श्रध्दास्थान डॉ. रामराव महाराज यांचा आशीर्वादरुपी आदेश*
*व मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेतील संत सेवाभाया ग्रंथ लेखनास सुरवात* …
*प्रा. दिनेश एस.राठोड लिखित Bhimniputara’s GORPAN: The Linguistic Beauty In Gor-Boli Dialect व प्रा. संतोष एच. राठोड लिखित आब गोरबोलीम इंग्लिश बोलेरो सिका (Now Speak English Through Gor-Boli ) या दोन्ही इंग्रजी भाषेतील पुस्तकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक व अभूतपूर्व यश प्राप्तीनंतर* आता सेवाभायाः जीवन कार्य यावर वैज्ञानिक पध्दतीने विवेचन करणारा ग्रंथ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणार..
विश्वाचे साकल्याने स्वरूप काय ? ’हा प्रश्न विविधांगी भूमिकेतूनही विचारण्यात येतो. वेगवेगळी विज्ञाने विश्वाच्या ज्या विविध अंगांचा अभ्यास करतात त्यांच्या पलीकडे असणारे, त्यांच्याहून श्रेष्ठ असे एक अस्तित्व, सत्तत्त्व आहे आणि त्याचे स्वरूप समजावून घेणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे, त्यायोगे गोर बंजारा जमातीतील सेवाभाया (संत सेवालाल) एक आदर्श तत्त्वज्ञानी, क्रांतीकारी, योध्दा, विचारवंत व समाज सुधारक अशी त्यांची अलौकिक व विविधांगी भूमिका आहे. विज्ञान, निरीक्षण आणि अनुमान ह्यांच्या साहाय्याने सेवाभायांच्या महानतेचे रहस्य यावर तात्त्विक लेखन होने गरजेचे आहे. एक जग विख्यात तत्वज्ञानी सेवाभाया जगासामोर आदर्श ठरावा या उदात्त्त हेतूने प्रेरित होवून आजच्या ग्लोबल युगात सेवाभाया सात समुद्राच्या पलीकडे पोहोचला जावा..गोर बंजारा वैश्विक संस्कृतीचे उदात्तीकरण व्हावे म्हणून एकाचवेळी *आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेत प्रा. दिनेश एस. राठोड द्वारा Sewabhaya: The Great Philosopher Par excellence* , तसेच *गोरबोली व हिंदी भाषेत सेवाभायाः महान तत्त्वज्ञानी* *ग्रंथाचे लेखन प्रा.संतोष एच. राठोड* यांनी या ग्रंथ लेखनास रामराव बापूच्या आशीर्वादाने उपरोक्त ग्रंथ लेखनास सुरवाता झाली आहे…
सदर ग्रंथ लेखनासाठी श्रद्धेय रामराव बापू व बाबुसिंग महाराज पोहारा देवी संस्थान, शंकर आडे पत्रकार यांनी आवश्यक ते संदर्भ साहित्य पुरवीले आहे.. जर आपल्याकडे सेवाभायांच्या जीवन कार्यावर मौखिक वा लिखित स्वरूपाची माहिती (पोती), संदर्भ ग्रंथ पुस्तके असतील व या मौलिक आंतरराष्ट्रीय ग्रंथात ती समावेश व्हावी अशी आपणांस अपेक्षा असेल तर आपण आम्हास खालील मोबाईल. क्र. संपर्क करून समाजकरवी आम्हास उपकृत करावे..
*आपले समाजऋणी,*
*प्रा. दिनेश एस. राठोड*
*प्रा.संतोष एच. राठोड*
( मुंबई )
📞 9404372756
9867129940
प्रमुख प्रतिनिधि: रविराज एस, पवार 8976305533