लोहा (प्रतिनिधी) – जगात व भारतात बहुजनाच्या हक्कासाठी व परीवर्तनासाठी जेवढय़ा क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले हीच बहूजनासाठी सर्वात मोठी क्रांती होय. असे प्रतिपादन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा.सुरेश जाधव यांनी केले. लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे राजशात्र विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय संविधान या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. आम्ही संविधानाच जन्मतो आणि संविधानाच मरतो म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जन्म घेतला की जन्माचा दाखला आणि मरणा पावा की मृत्युचा दाखला कायद्याने द्यावा लागतो. रस्त्याने कसे चालावे येथून ते दिल्लीत कायदे कसे निर्माण करावे. यांची चौकट संविधानानी घालुन दिली आहे. भारतीय संविधानातील कायद्यापुढे समानतामुळे भारतात असणारी हजारो वर्षांची विषमता नष्ट झाली. एवढय़ा महान ग्रंथांची, संविधानाची जाणीव बहूजनात असायला हवी. असे प्रतिपादन केले. पुढे बोलतांना सांगितले की, भारतीय संविधानातील मूलभूत हितांच्या बाबींना मनोवादी व्यवस्थेकडुन गोठवण्यात येत असेल तर ते धोरण बहूजनांनी मोडीत काढले पाहीजेत. आमच्यावर लादलेल्या चुकीच्या ग्रंथांना जेवढे जपतो तेवढे आम्ही संविधानाबद्दल डी.डी.घोडगे यांनी भारतीय संविधानानी समता, स्वातंत्र्य, न्याय ही मुल्ये दिली असून युवकामध्ये संविधाना विषयी जागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. प्रारंभी प्रा.आर.डी.शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणातून संविधान दिनाची गरज व लोकशाही बाबत भुमीका विषयी केली. यावेळी प्रा.डॉ.सुर्यकांत शिंदे ही मनोगत व्यक्त केले. तत्पुर्वी संविधानाचे सामुहीक वाचन करून शेवटी आभार प्रदर्शन मानण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा.किरण येरावार, प्रा.पी.के.मोरे, प्रा.डॉ.राजपाल चिखलीकर, प्रा.डी.आर.कांबळे, प्रा.डॉ.घोगरे, प्रा.सौ.तोरावाड मॅड, प्रा.रणविरकर, उल्हास राठोड, मोहन धोंडगे व महाविद्यालयातील मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.