*जय सेवालाल जय वसंत*
????????????????????????
*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित ****
????????????????????????
*भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान*
????????????????????????????????????????????????
*भाग-9 *वाचा*
*भारतीय संविधान*
*भारतीय घटनेची उगमस्थाने* *(आधारस्थाने)*
१) विविध देशांच्या राज्यघटनांवरून पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला.
इंग्लंड – संसदीय राज्य पध्दती नामधारी राजा, पंतप्रधान, मंत्रीमंडळाची सामुहीक जबाबदारी, निवडणूक प्रक्रिया, कायद्याचे राज्य इ.
अमेरिका – लिखित राज्य घटना राज्य घटनेची उद्देश पत्रिका, मुलभूत अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उप राष्ट्रपती इ.
कॅनडा – संघराज्य शासन पध्दती, प्रभावी मध्यवर्ती सत्ता संघ सरकारकडे देणे, राज्यपालांची निवड, शेषाधिकार इ.
आयलँड – राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपती पदासाठी निर्वाचन मंडळाची पध्द्ती अशा गोष्टी इ.
ऑस्ट्रेलिया – संसदेच्या दोही गृहांची संयुक्त बैठक, सामाईक सूची आणि त्यासंबंधी केंद्राचे कायदे घटक राज्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याची पध्द्ती इ.
द. आफ्रिका – घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेण्यात आली.
जर्मनी – अंतर्गत आणीबाणी
रशिया – समाजवाद
जपान – मुलभूत कर्तव्य
२) १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याचा प्रभाव – भारतीय घटनेचादोन तृतियांश भाग १९३५ च्या कायद्याच्या आधारे घेतलेला दिसतो. त्या कायद्यातील तरतुदी गरजेनुसार बदललेल्या आहे. उदा – संघराज्य पध्दती, केंद्रीय कायदेमंडळ अधिकाराची विभागणी, सर्वोच्च न्यायालय इ.
*कार्यकारी मंडळ*
भारतीय घटनेच्या कलम ५२ ते ७८ मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतुद आहे. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्री परिषद यांचा समावेश होतो.
*राष्ट्रपती*
भारतीय घटनेच्या पाचव्या भागात ५२ ते ६२ मध्ये राष्ट्रपती संबंधीची ततरूद लेलेली आहे. कलम ५२ मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटले आहे.
भारताचा संपुर्ण राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. परंतु प्रत्यक्षात सत्ता प्रमुख आहे. भारताचा राष्ट्रपती नामधारी घटनाप्रमुख असून पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ वास्तववादी सत्ता प्रमुख आहे.
कलम ७४ – राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. (४२ व्या घटनादुरुस्तीने) मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे.
*राष्ट्रपतींची निवडणूक –*
भारताच्या राष्ट्रपतींची निवडणुक अप्रत्यक्ष निवडणुक पध्दतीने होते. १) संसदेची दोन्ही सभागॄहे व २) घटक राज्यांच्या विधानसभा यांतील विर्वाचित सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. (टिप – विधान परिषदातील सदस्यांना तसेच राज्यसभा व लोकसभा यांतील नियुक्त सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिलेला नाही.) ????????????????????????????????????????
*संकलन*
*प्रा.दिनेश सेवा राठोड*
*कैलास डि. राठोड*
*क्रमशः*भा 10 मध्ये उद्या ✍????
~गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com