संशयावरुन जाळून मारण्याचा प्रयत्न केलेल्या सावन राठोड या मुलाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला

पुणे : “चोरीच्या संशयावरुन जाळून मारण्याचा प्रयत्न केलेल्या सावन राठोड या मुलाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 75-80 टक्के भाजलेल्या सावनने ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कसबा पेठेत गाडीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरुन तिघांनी काल सावनला पेट्रोल पाजून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत त्याची छातीला जबर दुखापत झाली होती. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान सावनने प्राण सोडले.

दरम्यान, या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी कालच अटक केली असून आज त्यांना कोर्टात सादर करण्यात येणार आहे. आरोपींवर काल कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता, मात्र आता त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्ह्याची नोंद होईल.

सावन राठोड हा मूळचा सोलापूर/कोल्हापूरचा आहे…..!!!”