सतगरू सेवालाल जेंतीर सायीछा

संत श्री सेवालाल महाराज (सतगरू सेवालाल माराज)

कोणताही लेखी साहित्य नसताना,कोनतीही प्रतिमा काढलेली नसताना केवळ मौखिक सीकवणीच्या जोरावर संपुर्ण जगभरातील करोडो गोरबंजाराच नव्हे बहुजनांचे गोरगरीब दीनदूबळ्यांचे (गोर कोर यांचे ) श्रध्दास्थान व आराध्यदैवत.

कोनत्याही ग्रंथात ऊल्लेख नसताना स्वतंत्र ओळखच नव्हे स्वावलंबनाचे,स्वाभिमानाचे व सहिष्णुतेचे धडे देणारे एकमेव समाजसेवक

• संत श्री सेवालाल महाराज यांना गोर बंजारा समाजामध्ये सतगरू (सत्यमार्ग दर्शविणारा) असे संबोधतात.

• सतगरु सेवालाल महाराजः भटकंती अवस्थेतून अध्यात्म ाची जोड देणारे आद्यसंत, अंधश्रद्धेतून व अज्ञानातुन प्रकाशाकडे आनणारे आद्यगुरु,प्रसंगी नाठाळांना व मानवविरोधी अन्याय अत्याचार करणार्यांचा कोनत्याही साधनाविना पराजीत करनारा महानयोध्दा, इंग्रज व देशी जुलमी राजवटीविरोधात बंड करणारा क्रांतीकारक,विदेशी काफीर फीरंग्याना भारतातून हद्दपार करण्यासाठी मजबूर करणारा देशभक्त व सर्वधर्मसमभाव मानुन विश्वबंधुत्व माननारा व मानवधर्माचे प्रचारक

• सतगरू सेवालाल (सेवालाल भीमानायक राठोड(रामावत भूकीया) यांचा जन्म 15 फेब्रुवारी, 1739 गोलाल डोडी , ता. गुत्त्ती जि.अनंतपूर ( आंध्रप्रदेश ) येथे झाला.

• जन्मापासून ते मरेपर्यत त्यांनी संपुर्ण गोर बंजारा व बहुजनाला ( गोर कोर ) सत्यमार्ग, अहिंसा, अस्‍तेय, अपरिहार्य, करूणा या पंचमार्गाचा ( पाचपारा ) त्यांनी अवलंब केला.

• सतगरू सेवालाल यांना गोर कोर सतगरू (भाया) मानत, “गोर कोर मन भाया कछ, केती करु ये वाया” ( सतगरु सेवालाल म्हणायचे की मला सर्व समाज भाया अर्थात भाऊ मानतो तर मी कोणाशी लग्न करु कारण सर्व माझे बांधव आहेत.) ते सर्व धर्म समभाव, विश्वबंधुत्व व विश्वकुटूंबांची संकल्पना मानणारे होते.

• त्यांनी आदर्श तांडा संस्कृती निर्माण केली.

• स्वावलंबाने व स्वसरंक्षणाचे धडे देण्यासाठी कवायती फौजीच्या धर्तीवर स्वता:ची फौज निर्माण केली.
• अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढतांना गुलाब खान, दिल्ली व निजाम शहा, हैद्राबाद यांच्या पाशवी जाचक व कठोर शासनापासून जनतेला मुक्त केले.

• नॉस्टेडॅमस यांच्या सारखे सतगरू सेवालाल यांनीही प्रसिध्द भविष्यवाणी केली . भविष्याचा वेध घेऊन केलेली भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे. उदा. जाणजो, छाणजो पछच माणजो (पहिले पहा, तपासा व नंतरच बुध्दीच्या कसोटीवर पटत असल्यासच ते माना )

• मलकेर वात पलकेम करीय ( स्वदेशातील व्यक्ती विदेशातील व्यक्तीला बोलेल, जसे की आज एका देशातून दुस-या देशातील व्यक्तींना सहज बोलतो येते कारण म्हणजे आजची दुरसंचार पध्दती उदा. दुरध्वनी , भ्रमणध्वनी ई.)

• रपीया कटोरो पाणी वक जाय , बळदेर सिंग सोनेर वेजाय, रपीया तेर चणा वक जाय (एक रूपयाला पाणी विकला जाईल उदा. बिसलरी, बैलाच्या सिंगाला सोन्याचे भाव मिळेल उदा. पशू प्राण्यांची आजची वाढती किंमत, रूपयाला तेरा चणे विकले जातील उदा. महागाई )

• मायेन बेटा परको वीय , लंडीरो राज आय (आईला मुलगा परका ठरेल उदा. आज आई वडीलांची सेवा करणारी माणसे खुप झाली असल्याने आई-वडीलांना वृध्दाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो, लबाड व खोटे बोलणा-या व्यक्ती सुखाने जगतील )

• कसाबेन गावडी मत वेचो व हालालेर मासं मत खाव (“ गो ” म्हणजे गाय “ र ” म्हणजे रक्षण करणारा गोर बंजारा समाज हा गाईला अनन्य साधारण महत्व देतो, तथापि तीचे पुजन करतो, मुलत: हा समाज गो-पालन करणारा आहे. गाईचे महत्व त्याकाळी सतगरू सेवालाल यांनी सांगताना त्यांच्याकडे 3755 एवढया संख्येने गाई होत्या. म्हणून त्यांनी कसायाला गाई विकू नये व कसायाचा हातचे कोणतेही मासं खाऊ नये कारण सर्वात प्रिय गाईला कापणा-या कसायाच्या कोणत्याही प्रकारचे महत्व त्यांनी दिले नव्हते )
• सत कर पत कर जागेर जत कर लंडी बुची पार कर गोरे माई गोर कर , सिकच सिकावच सिके राज घडावच ( सत्य कर्म कर व सत्याच्या मार्गाने जा, सत्यामुळे समाजात पत अर्थात त्या व्यक्तीला सन्मान प्राप्त होतो, जेव्हाचे काम तेंव्हाच करा, खोटे बोलू नका खोटया मार्गाचा अवलंब करू नका, तुम्ही गोर (संशोधन व विचार) आहात त्यामुळे समाजात सर्वमान्य असे विचार आत्मसात करा, जगात कोणत्याही समाजाचा सर्वांगिण विकास शिक्षणाशिवाय होवू शकत नाही. शिकणारी व्यक्ती आदर्श पिढी व राज्य निर्माण करू शकते)

• अशा या थोर व्यक्तीने शेवटी रूयीगढ येथे चिरनिद्रा घेतली त्यांच्या अंतीम ईच्छेप्रमाणे त्यांना पोवरागढ (पोहरादेवी ) येथे अग्नीसंस्कार झाला होता.परंतू त्यांच्या मृत्युबाबत शंका आहे जो अद्याप सुटलेला नाही.
निलेश प्रभू राठोड
Sent from my iPhone

Sanjay Dulichand Rathod
Minister of State for Revenue
& Joint Guardian Minister of Yavatmal,Guardian Minister of Washim,GOVERNMENT OF MAHARASHTRA,
Mantralay,Mumbai.400032