सतगरू सेवालाल महाराज

सतगरू सेवालाल माराज
• संपुर्ण जगभरातील गोर बंजारा समाजाचे व बहुजनांचे ( गोर कोर ) श्रध्दास्थान व आराध्यदैवत

• संत श्री सेवालाल महाराज यांना गोर बंजारा समाजामध्ये सतगरू (सत्यमार्ग दर्शविणारा) असे संबोधतात.

• सतगरु सेवालाल महाराज हे आद्यसंत, आद्यगुरु, महानयोध्दा, क्रांतीकारक, समाजसुधारक, देशभक्त व मानवधर्म माननारे होते.

• सतगरू सेवालाल यांचा जन्म 15 फेब्रुवारी, 1739 गोलाल डोडी , ता. गुत्त्ती जि.अनंतपूर ( आंध्रप्रदेश ) येथे झाला.

• जन्मापासून ते मरेपर्यत त्यांनी संपुर्ण गोर बंजारा व बहुजनाला ( गोर कोर ) सत्यमार्ग, अहिंसा, अस्‍तेय, अपरिहार्य, करूणा या पंचमार्गाचा ( पाचपारा ) त्यांनी अवलंब केला.

• सतगरू सेवालाल यांना गोर कोर सतगरू (भाया) मानत, “गोर कोर मन भाया कछ, केती करु वाया” ( सतगरु सेवालाल म्हणायचे की मला सर्व समाज भाया अर्थात भाऊ मानतो तर मी कोणाशी लग्न करु कारण सर्व माझे बांधव आहेत.) ते सर्व धर्म समभाव, विश्वबंधुत्व व विश्वकुटूंबांची संकल्पना मानणारे होते.

• त्यांनी आदर्श तांडा संस्कृती निर्माण केली.

• स्वावलंबाने व स्वसरंक्षणाचे धडे देण्यासाठी कवायती फौजीच्या धर्तीवर स्वता:ची फौज निर्माण केली.
• अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढतांना गुलाब खान, दिल्ली व निजाम शहा, हैद्राबाद यांच्या पाशवी जाचक व कठोर शासनापासून जनतेला मुक्त केले.

• नॉस्टेडॅमस यांच्या सारखे सतगरू सेवालाल यांनीही भविष्यवाणी केली . भविष्याचा वेध घेऊन केलेली भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे. उदा. जाणजो, छाणजो पछच माणजो (पहिले पहा, तपासा व नंतरच बुध्दीच्या कसोटीवर पटत असल्यासच माना )

• मलकेर वात पलकेम करीय ( स्वदेशातील व्यक्ती विदेशातील व्यक्तीला बोलेल, जसे की आज एका देशातून दुस-या देशातील व्यक्तींना सहज बोलतो येते कारण म्हणजे आजची दुरसंचार पध्दती उदा. दुरध्वनी , भ्रमणध्वनी ई.)

• रपीया कटोरो पाणी वक जाय , बळदेर सिंग सोनेर वेजाय, रपीया तेर चणा वक जाय (एक रूपयाला पाणी विकला जाईल उदा. बिसलरी, बैलाच्या सिंगाला सोन्याचे भाव मिळेल उदा. पशू प्राण्यांची आजची वाढती किंमत, रूपयाला तेरा चणे विकले जातील उदा. महागाई )

• मायेन बेटा परको वीय , लंडीरो राज आय (आईला मुलगा परका ठरेल उदा. आज आई वडीलांची सेवा करणारी माणसे खुप झाली असल्याने आई-वडीलांना वृध्दाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो, लबाड व खोटे बोलणा-या व्यक्ती सुखाने जगतील )

• कसाबेन गावडी मत वेचो व हालालेर मासं मत खाव (“ गो ” म्हणजे गाय “ र ” म्हणजे रक्षण करणारा गोर बंजारा समाज हा गाईला अनन्य साधारण महत्व देतो, तथापि तीचे पुजन करतो, मुलत: हा समाज गो-पालन करणारा आहे. गाईचे महत्व त्याकाळी सतगरू सेवालाल यांनी सांगताना त्यांच्याकडे 3755 एवढया संख्येने गाई होत्या. म्हणून त्यांनी कसायाला गाई विकू नये व कसायाचा हातचे कोणतेही मासं खाऊ नये कारण सर्वात प्रिय गाईला कापणा-या कसायाच्या कोणत्याही प्रकारचे महत्व त्यांनी दिले नव्हते )
नीलीया परभीया भूकीया