“समता अभियान स्थापन” – सुखी चव्हाण

समता अभियान स्थापन????

परळ मुंबई येथील दामोदर सभागृहात दि. 20/7/2016 रोजी ” समता अभियान या सामाजिक जनसंघटनेची स्थापना बुधवारी डॉ भालचंद्र मुनगेकर यांनी केली. विशेष म्हणजे याच ठिकाणी 92 वर्षापूर्वी म्हणजे 20/7/1924 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहीष्कृत हितकारणी सभा,या सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. या वेळी प्रामुख्याने समता अभियान स्थापनेची प्रमुख ध्येय धोरण व उद्दिष्टे डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले. तसेच या वेळी प्रामुख्याने 10ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. 1) भारतीय राज्यघटनेचे, संविधान संरक्षण करणे. 2) दलित आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे .4) विमुक्त भटके जमाती ना लागु केलेली क्रिमीलेयर ची अट रद्द करणे. 5)जातीचे दाखले देण्याची पध्दत सुटसुटीत करणे 6) जात पडताळणी चा कायदा रद्द करणे 7) अनुसुचीत जाती,जमाती साठी असलेली आर्थिक तरतूद इतरत्र न वळवता, तिचा पूर्ण विनियोग योग्य प्रकारे करणे.8) सावित्रीबाई फुले चा जन्मदिवस 3 जानेवारी” महिला शिक्षण दिवस ” म्हणून जाहीर करणे. जी मा भालचंद्र मुणगैकर यांनी राज्यसभेत या पुर्वी च केली आहे.9) सफाई कामगारांना मोफत घर व मुस्लिम समाजाला सच्चर आयोग लागु करणे. 10) अनुसुचीत जाती जमाती, विमुक्त भटके ईतर मागास वर्ग यांचे साठी असलेल्या राखीव जागांची पूर्णपणे अंमलबजावणी करणे, अनुषेश भरणे.
ईत्यादी ठराव मंजूर करण्यात आले.व समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय यावर आधारित भारतीय संविधान ची अंमलबजावणी करण्यासाठी ,सामाजिक आंदोलन उभे करणे. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गोर माटी भाईयो
ठराव क  4,5,6 व् 10
या ठराव करिता जे विश्लेषण
डॉ भालचंद्र मुंणगेेकर सरानी केले ते फार बोलके होते
सर्व समाज किती चुकीच्या गोष्टी इम्प्लीमेंट केल्यामुळे
होरपळतो आहे या बद्दल
मत मांडताना संविधान ची पायमल्लि होत आहे कथनी व् करनी मधे अंतर आहे ह्या बद्दल खंत व्यक्त केली
सरांचे आभार मानावे तेवढे कमी आहे
त्यानी विमुक्त भटक्यांची व्यथा
राष्ट्रिय पातळीवर नेण्याचे धेय ठेवले आहे
ह्या एतिहासिक समता अभियान स्थापनेस मी सुखी चव्हाण ,अम्बरशिंग चव्हाण ,उल्हास राठौड़  हजर होतो
अम्बरशिंग चव्हाणभाई ने मंचा चा वरुन समाजाच्या व्यथा मांडल्या व् सरकारने कसा विश्वासघात  करुणआम्हास व् सराना कसे फसविले या बाबत सांगितले त्या वेळेस सभागृह चिंतेत पड़ताना दिसले त्या करिता सर्व समाज विमुक्तांच्या पाठी आहे अशी गवाही  दिली
सुखी चव्हाण

~ गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,
www.banjaraone.com

image