समाज संघटित करण्या करिता खालील बाबी
बहुमोल ठरेल
समाज एकसंघ करावयाचे असेल तर सर्व संघटनेच्या लोकांनी सयुक्तिक पणे आपले
विचार विनिमय करून उद्धेश सफल करने योग्य होईल आपआपसातील वैचारिक मतभेद
दूर करून दृढ विस्वास निर्माण झाला पाहिजे
समाजाच्या प्रत्येक उच्च पदस्य संघटनेच्याव्यक्तींनी समाजाशी विश्वासघात करणार नाही, समाजाचे दुःख हे माझे दुःख आहे
समाजाच्या कोणत्याही घटकावर टीका अथवा लांचंन लावणार नाही, समाजातील गोरगरीबाची दलाली करणार नाही,लुबाडणार नाही समाज प्रोबोदन संत सेवालाल बापू च्या शपतेवर करेल,रात्री बे रात्री रुग्ण किंवा काही अडचणी असतील तर धाव घेईल,कुठेही
गोर समाजावर अत्याचार झाला तर कुठलाही न्यूनगंड न बाळगता धाव घेईल
तुमच्या पाठीशी कितीजण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
ह्याचे आत्मपरीक्षण करून
समाजास अभि वचन द्यावे.
आपली वाणी समाजाशी संवाद साधताना मधुर असली पाहिजे व अत्याचार झाले तर
प्रखर व कठोर झाली पाहिजे.
आपल्या विखारी बोलन्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .नाते तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असलीपाहिजे.आणि
नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची
सवय नसली पाहिजे.
संबध असे तयार झाले पाहिजे कि कधीही तुटणार नाही अशी घट्ट मैत्री झाली पाहिजे कि
कोणतीही वेळ आली तर पूर्ण सघटनेतील मित्र निस्वार्थपणे एकमेकांना साथ दिली पाहिजे .मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
सर्व गोरबांधवांना प्रेमाने वागाव त्यांची व्यथा शांत पणे समजून घ्यावे.
कारण आज काही लोकांमध्ये गर्व झाला आहे स्वतःचे सामाजिक स्तर उंचावल्याने इतरांकडे कमीपणाने बघतात पारंपारिक सण असेल त्यास जाणून बुजून भाग घेत नाही .त्या मूळे संस्कृतीचे मारेकरी यांना म्हणावे लागेल.त्यांना हि समाज प्रबोदन ची आवश्यकता निर्माण झाली आहे.
–सुखी चव्हाण,बदलापुर
9930051865
गोर कैलास डी राठोड
बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल मुंबई,
website: www.banjaraone.com