नांदेड (प्रतिनिधी)ः नुकत्याच सहकारी शिक्षण पतपेढीची 85 वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ह्या सर्वसाधारण सभेत सर्व संचालक मंडळानी प्रल्हाद राठोड सराची पुनश्चः चेअरमनपदी एक मताने निवड केली आहे. ह्या सहकारी पतपेढीची स्थापना 1930 मध्ये झाली आहे हि मराठवाडय़ातील पहिली पतपेढी असून ह्या पतपेढीची 15 कोटी रुपयाची भाग भांडवल समता असून 5194 येवढी सभासद संख्या आहे. या पतपेढीचे प्रल्हाद राठोड हे बंजारा समाजातील पहिले चेअरमन आहेत त्यांच्या या दुबार निवडीबद्दल शाम राठोड, शिवाजी चव्हाण, आर.सी. राठोड, उल्हास राठोड, वसंत जाधव, विनोद चव्हाण, मेहरबान पवार, सुभाष जाधव, एम.एम. राठोड, दादाराम जाधव, विनोद राठोड, दिगंबर राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.