सहकार पॅनलचा दणदणीत विजय प्राचार्य लक्ष्मण राठोड यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय

नागपूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांसाठी प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था उदखाना नागपूरया पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्व.सपाटे स्व.सोवशीं व संस्थापक मधुकर धरमनाळी पुरस्कृती सहकार पॅनलचे सर्व उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले तर प्रतिस्पर्धी सहकार सहयोग पॅनलचा सर्वत्र सफाया झाला. या निवडणुकीत सत्तारूढ सहकार पॅनल व सहकार सहयोग पॅनल यांच्यात दुहेरी लढत झाली. सहकार (सत्तारूढ) पॅनलचे प्रमोद भाखुड, राजेश राउत, राजेंद्र सुके, लक्ष्मण राठोड, ज्ञानेश्वर काळे, रमेश तायवाडे, वर्षा सावरकर, अशोक लाटकर, तेजकरण हतग्या, दिवाकर कोहळे, राजेंद्र भोयर, विशाल बंड, सुनील कुर्रेवार, गोविंद ठाकरे, विशाखा ठमके, सरला कुशे, मिना सरोदे, अतुल टेकाडे व उत्तम येडे o विजयी झाले. 2015-06-21_141539

सहकार सहयोग पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. या पॅनलचे विजयी शिल्पकार ठरलेले मधुकर धरममाळी यांनी ही संस्था सतत प्रगतीपथावर नेली असून यापुढे अधिक पारदर्शी व सभासदाचे हीत लक्षात घेऊन कार्यभाराची अपेक्षा व्यक्त केली. अधिक मताधिक्याने आलेले लक्ष्मण राठोड (प्राचार्य महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खापरखेडा) यांनी नवीन व्यवस्थापक मंडळ अधिक पारदर्शक कारभार करणार असून संस्थेला लौकीक मिळवून देण्याचा मानस व्यक्त केला. सर्व समासदांनी संस्थेच्या हितांसाठी सहकार पॅनलला मोठे यश दिले आहे. सर्व विजयी उमेदवारांची संस्थापक मधुकर धरममाळी, देविदास कुधे, सुर्याजी राऊत, श्रीकांत पागृत, पंजाबराव आरघोडे, ए.एम.भांडारकर, अनिल साठवणे, मारोती खेडीकर, आनंदराव कारमोरे, एल.एस.दोरखडे ए.ए.लोदरे, राजेश तु सरे, हे ंत मांडेकर, विशाल टेंभूर्णे आदिंनी स्वागत केले.