साऊ ते जिजाऊ विचारांची प्रेरणा घेऊया , स्व नेतृत्व विकासातून परिवर्तन घडवूया – मा.अर्चना वैद्य

प्रतिनिधी ( राजू चव्हाण )

चाळीसगांव :- चाळीसगांव येथील सावित्रिमाई फुले महिला संघटन आयोजित सावित्री अभिवादन सभा दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी महात्माफुले लाईफ एण्ड मिशन सेंटर ,महात्माफुले नगर येथे संपन्न झाली.

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.अर्चना वैद्य, (क्रांतिजोती वुमेन्स नेटवर्क ,पुणे) तर अध्यक्ष स्थानी मा.दिलीप चव्हाण (संचालक, साद संवाद) होते. मा. अर्चना ताई वैद्य यानी “आजच्या बहुजन स्त्रियांची दशा आणि दिशा” या विषयावर व्याख्यान दिले. सद्य कालीन बहुजन स्त्रियांन समोरील आव्हाने पेलताना स्त्रियांना सावित्री माई फुले आणि माता जिजाऊ यांच्या विचारांची कास धरावी लागणार आहे आणि साऊ जिजाऊ यांच्या विचारातच सद्या परिस्थितिची उत्तरे मिळणार आहेत.सोबतच आपल्या मुलांना वाढवताना मुलगी मुलगा असा कोताही फरक न करता दोघां बालवयातच समतेचे धडे दिले गेले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता येईल तसेच वैद्य यांनी बहुजन महिलांना स्व नेतृत्व विकासातूनच परिवर्तन करता येईल. त्यासाठी सर्व महिलांनी सर्व बहुजन महानायिकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिलीप चव्हाण यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाने महिलांना दिलेले अधिकार आणि त्यामुळे महिलांच्या जीवनातील अमुलाग्र बदल हे विषद केले.

तसेच सावित्री माई यांच्या जयंती चे औचित्य साधुन सावित्री माई फुले महिला संघटन, चाळीसगांव यांची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहिर करण्यात आली ती खालील प्रमाणे
कार्यकारणी
अध्यक्ष:- सरला अहिरे
सचिव:-शीतल पानपाटील
उपाध्यक्ष:- अनुसया पाइकराव
उपाध्यक्ष:- सपना मोरे
सह सचिव:- भारती निकम
सह सचिव:- भाग्यश्री गवले
कोषाध्यक्ष:- शोभा वानखेडे
सह कोषाध्यक्ष:- शालुताई भोसले
सह कोषाध्यक्ष:- उज्वला कांबले

सदर कार्यक्रमास सावित्री माई फुले संघटन, चाळीसगांव यांचे सभासद व सुजाता महिला संघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली निकम यांनी तर सूत्रसंचालन कल्पेश आणि आभार प्रदर्शन शीतल पानपाटील यांनी केले.