“सावरगांव बंगला माझे गांव”
ग्रामपंचायत सरपंच व सदस्याच्या वतिने सावरगांव बंगला ता.पुसद जिल्हा यवतमाळ या गावी विद्युत पवन चक्कीचा बाजार..भरला आहे.माळपठारावरील 40 गावा पैकी एक गांव म्हणजे सावरगांव बंगला मौजे सावरगांब बंगला हे गाव अतिशय गरीब व महाराष्ट्रातच नाही तर देशात सर्वात जास्त सुशिक्षित बेकारी असलेला गांव व कोर्डवाहू जमिनीचा गांव..या गावातील गरीब शेतकऱ्यानां आपल्या जमिनीतील पिक पावसाच्या पाण्यावरच काढावे लागते.गावच्या गरीब शेतकऱ्यांना फालतुची लालच देऊन गावातील नेते लिडर आणी माजी.सरपंच व माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या आपल्या स्वताच्या 2% साठी गरीबांच्या कुळातील जमिन आड्या दिड्याच्या भावात त्या पवन चक्की वाल्या ठेकेदारास..घेऊन दिल्या व स्वता सावकार झाले..। “पण गरीबांचा वाली कौन”
सावरगांव बंगला ह्या गावचे बहुतेक परिवार दिवाळीच्या पहिलेच उस तोडनी साठी आपले आपले गठोडे बाधुन निघुन जातात..त्यांच्या नशिबी कधी दिवाळी सावरगांव या गावी राहिलीच नाही.
काईक परिवार दिवाळी झाल्याच्या दुसऱ्या दिवसीच गुडांळतात…देशाला स्वतंत्रता मिळुन 67 वर्ष झाले तरी या गावातील गरीब मजुरांना शेतकरी कधी होता आले नही…नाईक साहेबांनी ज्या गरीब परिवारांला जमीनी दिल्या त्याच जमिनी गरीबांन कडुन माजी सरपंच व माजी ग्रांम पंचायत सदस्य तथा गावातील फुकट खाऊ लिडर मोठ्या ठेकेदारांना सोबत घेऊन विकायला काढतात..तर त्या पवन चक्की वाल्या कडे त्या लिडर च्याऔळखीचेच मुल कामाला लावतात.. गरीबांचा किंवा ज्या कडे शेत नाही त्याला तरी कामाला लावले पाहिजे…
असी हि माझ्या गांव ची कहानी…
सौजन्य: गोर कैलास डी.राठोड
प्रचारक/स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,
चिफ एडिटर गोर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
Website: www.banjaraone.com