सेवाभायार बोल

मागील भागात आपण संत सेवादास, रामचंद्र सात, धर्मिसात यांनी भगवंतानी दिलेली शक्ती, निपुणता वापरुन संकट समयी ऐक्य निर्माण करुन संकटाचे निवारण केले, संत धर्मिसात यांनी संकट समयी बालाजीने दिलेले शक्ती वापरुन जलवृष्टी थांबवली, संत रामचंद्र सात यांनी पेढारियाशी बुद्धकरुनी संकट निवारीले पण, गंगाभरुन चाललेली आहे. मला जगदंबा यांनी संकट जाणविले आहे. आणि तिच पूर्ण करेल. त्या करीता आपण सर्वजन त्याचे चित्त आठवू या असे सेवादास सगळ्यांना सांगतात. तेव्हा सर्वांनी सहमती दिली. तेव्हा संत सेवादास सांगतात, आता मातादेवीचा गजर करुन चला आता. जेथे जगदंबा साह्य प्रत्यक्ष तेथे कोणतेही कार्य काय अशक्य आहे.

असे सेवादास म्हणाले व निशान धरुन पुढे चालू लागले. तेव्हा पाण्यातून जाताना पायाला काटे, सराटे झोंबू लागले. पण, काय करणार पेढारियाचे संकट हे कठीण आहे. आपण, जर पलीकडे गंगापार नाही केली तर आपला जीवघात करतील हे पेढारि करीता संत सेवादास निशान धरुन चालतात. त्या मागोमाग सर्वजन चालत निघाले. सोबत, गाई, वासरे, चालायला लागली तोच जलवृष्टीस जोर आला गाई, वासरे हंबरायला लागली. तेव्हा संत धर्मिसात भगवंतानी दिलेली शक्ती विभूतीपैरिळी नभा करणे जलस्तंभन प्रयोगाने, जलवृष्टी थांबविली. त्यामुळे सर्वजन चालायला लागले. संत धर्मिसाताच्या शक्तीने पाणी पडायचे थांबल्यामुळे सर्वजन जय बालाजी म्हणून गर्जना करतात.

तोच गंगेच्या किनारी पेढारी शत्रे घेवून आले. धरा मारा असे ओरडत होते. तेव्हा गाई वासरे ओरडायला लागली. तेव्हा संत रामचंद्रसात सगळ्यांना धीर देतात व सांगतो, काही घाबरायचे नाही. आपल्या मार्गाने चला भिती कशाचीही नाही. असे सांगून त्यांनी उपरी घेवोनिया विभूती कषरिता संकल्प एकचित्ती आणि सांगतो आम्ही गंगेच्या पलीकडे जाई तोपर्यंत जशी संत रामचंद्र सात यांनी वृष्टी बंद केली. तशा प्रकारे पेढारी बुद्ध होओ. असे हात जोडून कान्होबाची प्रार्थना केली. आणि सांगतो भगवंता आमच्या सोबत गाई, वासरे आहेत. नारी आहेत. बालके आहेत करिता हे संकट आहे करिता हे अनर्थ आहे रक्षावे. ऋतु श्रावणमासा गंगा महापूर फोफावत पाणी पाणी चोहिकडे आणि चिखल सुद्धा झालेले होते. पण संत रामचंद्र यांची प्रार्थना कान्होबानी ऐकली. पेढारियाचे माथ्यावरी अचानक ढग आले आणि विजा चमकायला लागल्या.

पाणी क्रोधभरे महाप्रलय वर्धन मेघ चाचले होते. त्यात पेढारी अडकले. आणि वृक्षाखाली दडून बसले तेव्हा झाडे पडती जन्मळोन तेव्हा पेढारी रानोरान झाले. आणि म्हणती परमेश्वरा आम्हाला वाचव. अचानक आम्हावर संकट कसे आले. लूट आमची गमावली कान्होबाची अगाध करणी पळता पुरली नाही धरणी अडखळोनी पडायला लागले. पण, आता गंगेच्या पलीकडे कसे जावे, असे संत सेवादास सोबत असलेल्या लोकांना सांगतात. पलीकडे जायची आस दिसत नाही. तेव्हा संत सेवादास जगदंबेशी आठवतात. हृयप्रती आणि माता जगदंबेशी सांगतो जननी या वेळेस लवकर धावूनी ये. मला स्वतःची खंत नाही. पण, नारी लेकरे सांगती, गाई, वासरे हंबरती हे मला डोळ्यानी बघवेना झाले आहे. बालाजीची कृपा झाली जलवृष्टी स्थिरावली. कान्होबाची कृपा झाली. आम्हा येथवरी पोहचविले.

तरी माता आता लवकर ये धावून. धाव झडकरी जगन्माते ऐशी स्तुती ऐकता ऐलावली भगवती ! चमत्कार भक्ताप्रती दावितसे क्षणामाजी. संत सेवादास गंगामातेस विनवीता आणि सांगतो आम्हास जावयास मार्ग लवकर दे. पण, गंगामातेनी विनंतीस मान अनुमात्र दिला नाही. तेव्हा संत सेवादास यांनी क्रोध भरोनी / भस्माचे मुटी केर कवळूनी गंगामाजी दिली फेकूनी आणि मागनी केली सकळाप्रती. भस्म फेकीताची सवेगा गंगा झाली दोन भाग. तेव्हा सर्वजन संत सेवादास याचा जय- जयकार करतात. सर्वजन पळत गंगेच्या बाहेर निघाले आणि माता अंबिकेचा जय-जयकार करतात. गंगा पहिल्यासारखीच वाहू लागली. सर्व पेढारी नदीवर आले. पण सर्व मंडळी गंगेच्या पलीकडे पोहचली होती. ते पाहून पेढारी विचार करीत होती. गंगेच्या पलीकडे कसे गेले संत सेवादास, सर्व मंडळी पेढारीयास दिसत होती. आणि सर्व मंडळीनी पेढारीयास पाहिले तोच सर्वांच्या अंगावर रोमांच उभरले प्राण घाताच प्रसंग होतो.

धन्य कैवारी सेवादास धन्य भवानी साह्यकरी. तीन भक्ताची झाली ऐकी / त्यामाजी धावे भगवती तेथे यशाचे काय टोटा. संत सेवादास व त्याच्या सोबत आलेली सर्वजन वर्षाऋतु म्हणजे श्रावण महिन्यात गंगापार केली. माता भवानी सवतः भस्म चिमुटी माजी बैसूनी संत सेवादास यांना जाण्यासाठी गंगेचे दोन भाग केली आणि गंगामातेनी संत सेवादास सर्व छावणीतील लोकांना गंगेनी वाढ दिली. म्हणून गंगामतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बंजारा बांधव तिज म्हणून गंगामतेचे पुजन करतात. कारण, गंगामाता जर वाट दिली नसती तर संत सेवादास व त्याच्या सोबत असलेली सर्व गराशा यांना प्राण गमवावे लागते असते. यासाठी सर्व बंजारा बांधवानी श्रावण मासातच प्रत्येक तांडय़ावरील बांधवांनी श्रावण मासातच कार्यक्रम घेवून कार्यक्रम करावे. हे प्रसंग घडले ते प्रसंग वर्षाऋतू श्रावण मासातच घडले करीता, शुद्ध मनाने, नशाबाजी न करता, सर्वांनी एकत्र येवून माता गंगेचे पुजन करावे. हे भवानी मातेचे त्रोत म्हणून गंगापुजन करावे असे मला वाटते.

जय सेवालाल.

राठोड मोहन बापूराव,
रा. चोंडी ता. लोहा जि. नांदेड
मो. 9421768140