मागील भागात आपण संत सेवालाल महाराज आपल्या सोबतीक घेवून गंगापार केली आणि सोबत असलेल्या मंडळींना गंगापलीकडे जावून गंगाकिनारी थांबले आणि सर्व सोबतींना जवळ बोलावून सांगतात आपण या ठिकाणी व्यर्थ बैसोनी एका ठिकाणी रहाने हे मला आवडत नाही.
आपली कमाई जर नसेल तर पैसा जवळ असलेल्या गाटीचा पैसा किती दिवस पुरेल त्या करिता काम केले पाहिजे असे संगत सेवादास सांगतात. वर्षाकाळी गंगेला पूर येतो. चोहीकडे पाणी-पाणी असतो, पण, जेव्हा उनहाळा लागतो तेव्हा गंगा कोरडीच असते. त्याकरिता आम्हाला बसून रहावे वाटत नाही. त्याकरिता आपण काय मेहनत केली पाहिजे असे संत सेवादास सांगतात. त्याकरिता आता सर्वजन मिळोनी. तुम्ही रायपूर आणि रतनपूरा या ठिकाणी जाणून तांदूळ भरोनी आणि भिवंडी कल्याण या ठिकाणी घेवून जा कारन त्या ठिकानी लाभ फार आहे करिता कोणीही अनुमात्र विचार करु नका. करिता संत सेवादास सांगतात वेळ ही लाख मोलाची आहे. त्या करिता वाया जावू देवू नका कल्यान या ठिकाणी जावून त्याठिकाणी तांदूळ विकून मीठ खरेदी करा आणि ते नागपूरला आणा त्या मीठाचे नागपूरला पैसे खूप येथील करिता आपल्याला हे व्यवहार चालू ठेवावे लागेल. त्या ठिकाणी पैसे खूप मिळतील करिता वेळ लावू नका म्हणून संत सेवादास सांगतात काम शिवाय वेळ वाया जावू देवू नका तेव्हा सर्वजन सेवादास यांना सांगतात तुम्हाला सोडून जाणे म्हणजे, आम्हाला खूप दुःख वाटत आहे. आणि कामामध्ये मन लागत नाही, तेव्हा संत सेवादास सांगतात. तुम्हाला दुःख वाटत असेल तर मी सुद्धा तुम्हा सोबत येतो, मुळीच शंका धरु नका आणि दुःख सुद्धा करु नका असे सेवादास सांगतात. तेव्हा सर्वांनी जायची तयारी केली आणि सोबत पुरा, हाप्पा बदू सुजान नाथं् वडते, लोखमा, खेतावत भिला कारभारी रुपासात, रामावत, नंदू विसळावत केसाजंगी आणि सोमाभंगी हे सर्व भीमाडी कल्याणाला जावयास सिद्ध झाले. कोणतेही काम करताना, शुभ मुहूर्त पाहूनच कामाला सुरवात केली पाहिजे, करिता शुभ मुहूर्त पाहून सगळेजन जाण्यास निघाले, तोच गराशा पुढे येवून वचन सांगतो, स्वामी, पुढारा मागे कठीण, या ठिकाणाहून कसार्या घाट तीन कोस आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विघ्न ओढावेल – या ठिकाणी, भिल्ललोक, पोलामाची, कांची वस्ती अफाट आहे. – त्या ठिकाणी तुम्हाला संकट येईल. त्या करिता त्या मार्गाने न जाता अन्य मार्गाने जावे. – गराशाचे बोल ऐकून संत सेवादास हासतात आणि सांगतात आपल्या शिरी आहे. भवानी आणि आपल्या सोबत खूप लोक आहेत करिता जरी संकट आले तर त्याला कोन जुमानेल सांगा त्याला कारण चित्ती जगदंबा आठवली असे सेवादास सांगतात. शंका होई उत्पन्न गराशा होय कोण कोठोनिया आलो येस्थान श्रोतयाशी कळेना तरी चित एकाग्र करुनी याचे उत्तर ऐका. कैलाशीचे प्रभू शंकर घेती अवतार भुमीवरी शंकराचा तोच अवतार सेवादास उद्धाराया आले जगास सकळ बंजारा समजात – ठाम लोकाचे मत आहे. – शंकराचे परमभक्त नंदिकेश्वर परमश्रेष्ठ शंकराचे सर्व नित्य राहात तसे. भीमानाईकाच्या दावनीत गाई होत्या तीन सहत्र त्याच्या मध्ये एक पांढरी धेनू होती एक ती उच्च खाणीची होती. त्या ग्रामामध्ये गाईचा प्रवेश झाल्याने नंदिकेश्वर घेई जन्म तोची गराशा थोर घेऊन संत सेवादास यांना प्रिय झाला गाईचिया सोंडाप्रत वदती गराशा बंजारी लोक ऐशे गराशाचे चरित्र सकळ जाणावे.
नित्य काळी संत सेवादास त्या गराशाना कुरवाळत असे संत सेवादास यांच्या कृपाहस्त शिरावर असल्यामुळे त्यला ज्ञान झाले. संताचे थोर महत्त्व संत देवाचे रुप प्रत्यक्ष रक्षावया संतय धर्मासा, संत हे ईश्वराचे रुप असते येथे शंका होई उत्पन्न, पशु लागे झाले ज्ञान हे कलियुगामध्ये कठीन, दिसतो. त्याचा पुरवा ऐका आता.
– पैठणीचे एकनाथ यांना काही निंदकांनी अडविले आणि सांगायला लागले तुमच्या अंगी सामर्थ्य आहे म्हणतात. तर आम्हाला दाखवा जर दाखवलात तर आम्ही तुम्हाला विष्णु अवतार समजू तेव्हा एकनाथ यांनी एक पेंढी कडब्याची घेतली आणि नंदीच्या मुखासी लावले तो नंदी यांनी पेंढी खाल्ली म्हणून सर्वठायी भगवंत आहे. हे वेदाचे सत्य आहे हे पाहून निंदक तोंड लपवून निघून गेले निर्जीव भित चालवली इतका संताच्या ठाई अधिकार काय अशक्य तया ठाई तेथे संत सेवादास यांच्या कृपेने गराशा होई पूर्ण ज्ञानी. – गराशापुढे येवोन जाणविले संकट पण, त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. – नित्य प्रमेश्वर संकटाची जाणीव मानवाला करुन देतो. – मार्गी चालताना सुचना चिन्हे अनेक दाखवतात, पण ते कोणालाही समजत नाही. – जे ज्ञानी असतात ते अनुभवतात आणि लाभ घेतात. – पशु पक्षी चिन्हे दावून मानवाला विघ्ने सुचवतात. – पण, ज्ञान नसल्यामुळे त्रास भोगावा लागतो. – गराशाने सगळ्यांना संकटाची जाणीव करुन दिली पण, ते कोणालाही पटले नाही. – संत सेवादास आणि सैन्य पुढे कोसाला मुक्काम करीत तोच दिवस मावळला, म्हणून सर्वजन नांदगाव या ठिकाणी मुक्कामी राहिले. – सगळे जन चालून थकल्यामुळे सगळ्यांना गाढ झोप लागली. – कोणीही जागी नव्हते अशा वेळी अर्धा रात्रीला भिल्लाही टोळी आली धावत. – चाहूला लागली गराशास खडबडोनी उभा टाकला. – हंबरोनिया समस्ताशी, त्वरे सकलाशी द्यावी जागृती असे गराशाच्या मनात होते. पण, त्या ठिकाणी वेगळेच असे भिल्ल अचानक आले आणि गराशाचे तोंड बांधले सैल फासे दिले चरणास, उपरी गेले घेवोनी. सगळे चोहीकडे होऊन त्याचे प्रत्येक ठिकाणी बांधून राहले यामुळे त्याचे सर्व प्रयत्न खुटले, नाही तर गराशा धडक मारुन आला असतो पण, भिल्लाची संख्या जास्त होती. जास्त संख्या असल्यामुळे गराशा एकटा काय करणार गराशा यांनी केला विचार मी जर एकटा जर शक्ती दाखवली तर माझा प्राण घेतील. हे लोक दुष्ट आहेत. जर प्राणी हानी झाली तर काय जन्माचे सार्थक होईल. – आता जगदंबेचे स्मरण करुन साह्य मागावे त्याच्याकडे. – या ठिकाणी सर्वजन उठलो आणि आपले कार्य आरोपीत होते. – पण गोठय़ांनी सगळ्या मधील सगळ्या गाई हुंबरती क्षणोक्षणी आणि जाणविती लोक प्रती. गेला गराशा रातोराती सावध होवोनिया समस्ती पुढे विचार करा पटकन आणि सगळे जन गराशकडे पाहावयास गेले पण, गराशा नाही. दावणीत तेव्हा सगळे जन संत सेवादास यांना जावून सांगतात तेव्हा संत सेवादास यांना फार दुःख झाले. संत सेवादास म्हणतात गराशा धन्य आहे. पशु असोनी आम्हाप्रती, जाजविलेशी संकट असोनिया मुक्के ढोर, जाणीवले संकट घोर पण आम्ही केला अविचार अनुमात्र दोष तुझा नाही.
– असोनी आम्हाप्रत मार्गी अडवोनी केलो सुचित पण, आमच्या देवी अनर्थ लक्ष जाणूवन बुजून दिले नाही. विनाश काली बुद्धी विपरीत । प्राप्त हो तसे दैववश अशी प्रचिती आज आली. – गराशाचे गुण आठवून संत सेवादास यांना दुःख होत से. – आणि सेवादास सांगतात गराशा तु कोढे अससील कोण्याठिकाणी अससील, कोणत्या ठिकाणी नेलो तुजला दुर्जनानी परिस्थिती त्या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी भलतेच घडून आले, तक्षकाचे फणीतून न्यावा काढोणी नागमणी तसेच आले घडोणी आपण इतके असोनिया. – संत सेवादास सांगतात काळ झोप आम्हावरी ! कैसी यवोनी पुढे रात्री ! कोणालाही जाग आली नाही. नेला सतवरी काढूनी ! नेला गराशा चोरुनीया. – आपले शिकारी श्वानप्रत यांना जाणीव झाली नसेल अनुमात्र – हे चमत्कार भलतेच दिसत आहे. जगदंबेची लीला न्यारी कैसी भिल्लानि मोहीनी घातली आणि सगळ्यांना झोप लागली असे संत सेवादास म्हणून हृदयप्रती तळमळ करीत असे. आणि गराशाची आठवण करीत सांगतात गराशा तुझे वचन मान्य करोनी सारे जन अन्य मार्गी जर निघून गेलो असते तर हे अनर्थ टळले असते. असे सेवादास सांगतात.
– असते जैसे विधी लिखीत तसे प्रत्यक्ष आज घडोनी आले आणि विनाश काळी तुझे वचन आम्ही मानलो नाही. असो, सेवादास आपल्या मनात देवी भवानी याची आठवण करुन सांगतात देवी भवानी माता, धाव धाव जननी संकट भारी आमुचे हे, – आज मला संकटाची जाणीव होतसे क्षणोक्षणी तरी माते धाव लवकरी ये समयची आणि गराशा आम्हास आनुंनदे नाही तर छावणीत, घोर आकांत ओढवेल. – गाई हुंबरिती समस्त त्याची चिंता सगळ्यांना पडली आहे. – जर तु लवकर नाही आलीस तर आम्ही याचा ठिकाणी जगन्माते, जगच्यालके, जगत्पालके, विश्वव्यापके भक्त पावके धाव आता- असे विनंवीत सेवादास देवीची आठवण करतात. आणि सांगतात माता आमचा प्राण असणारा गराशा येथून काढून नेल्या आहे. तेव्हा स्वतः श्री जगदंबा प्रगट झाली. तेव्हा संत सेवादास धरी चरण धावोनिया. – जोडोनिया दोन्ही हात सेवादास भवानी मातेस सांगतो. बरे झाले माता तु आलीस धावोनी संकट आम्हावरी पडले आहे. – माता जगदंबे फार कहर झाला आहे. – माझे दुःखवोनिय अंतर गेला गराशा कोणीकडे. कोणत्या ठिकाणी त्याला ठेवले असेल किंवा त्याचे प्राण घेतले असेल असे संत सेवादास दुःखी होवून भवानी मातेस सांगतात माते मला सांग याच वेळा गराशा म्हणजे माझा प्राण आहे. करीता मला सांग गराशा कोठे आहे. असे सेवादास सर्वांनी मातेस सांगतात.
राठोड मोहन बापूराव
रा. चोंडी, ता. लोहा
जि. नांदेड मो. 9421768140