“स्मार्ट सिटी की स्मार्ट शिक्षण”

* स्मार्ट सिटी की स्मार्ट शिक्षण *

जय सेवालाल…..
मित्र हो काही दिवसा पासुन देशात स्मार्ट सिटीचे वातावरण जोरात वाहत आसुन, स्मार्ट सिटी बनवायला सुरवात पण चांगल्या प्रकारे झालेली आहे.
ईकडे गरीब शेतकरी स्वताच्या शेतात राबराब करून शेवटी उतप्न न झाल्या मुळे सावकारीचे पैसे अंगावर असली की झोप येतनाही म्हणुन स्वताला या जीवनातुन संपवत आहे. आपल्या परिवाराची काळजी लागली मुलांचे शिक्षण, मुलीच लग्न व स्वताच्या पोटाची खळगी करून शेतीत पैसा गुतवनुक करून शेतीत हंगाम पुरेपुर होत नसल्या मुळे खाजगी सावकारी च्या कड्यात अडकुन आत्महत्या करत आहे.
स्मार्ट सिटी पेक्षा देशाला स्मार्ट बनवनारे शेतकरी व त्या गरीब शेतकर्यांची मुल यांना जास्तीत जास्त सुशिक्षित कसे बनवता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
व स्मार्ट सिटी पेक्षा स्मार्ट शिक्षण हे कार्य लहान लहान खेडे वस्त्या पर्यंत कसे पहोचवाल त्यावर भर द्यावे लागतील.
जर आपल्या देशाला दुसर्या देशाच्या तुलनेत बघायचे असतील तर स्मार्ट शिक्षण व स्मार्ट शेतकरी हि योजना सरकारनी राबवीली पाहिजे.
तरच आपला देश खर्या प्रगती पथावर पहोचेल.आणी आपल्या देशाची खरी प्रगती होईल.खरोखर देशातील गरीब शेतकरीच जर नाही राहिलेतर या स्मार्ट सिटीला कसला प्रधान्य मिळेल…?
व त्या स्मार्ट सिटीत राहणार कौन…?
ज्या देशात शिक्षण या क्षेत्राला जास्तीत जास्त वाटा मिळेल त्या देशातील गरीब जनतेला जास्तीत जास्त सुशिक्षित व्हायचे ओढ निर्माण होतील व सर्व समाज प्रगतिशील बनेल कौन कुठल्या कला क्षेत्रात काम करेल व ज्याच्या ज्याच्या परिने आपल्या पहिवारा सोबत आपले विचार घेऊन सुथाने जीवन जगतील.
ज्या देशात शिक्षणा पेक्षा स्मार्ट सिटी ला प्राधान्य मिळेल त्या देशातील गरीबांची संख्या जास्त असेल त्या देशात स्मार्ट सिटी चा अर्थ तरी कसा समजेल.
सर्व मार्गदर्शक व बुद्धिजीवी मंडळींना सांगाव अस वाटतं की जास्तीत जास्त शेतकरी व शिक्षणाला प्रधान्य मिळाव व महत्व पण देने गरजे चे आहे.
आजच्या वेळेला देशातील छोट्या छोट्या गांवा पर्यंत खरे शिक्षण पहोचविने हे महत्वाचे आहे.
जरी त्या गांवात शाळा असल्या तरी त्या शाळेत खरोखर शिक्षण मिळते का हे तरी स्थानिक लोंकानी जाऊन लक्ष देणे गरजेचे आहे.
या दोन गोष्टीत सर्वांनी मोलाची कामगिरी करावी.
या दोन गोष्टीत कोन्हीही राजकारण करूनये…
व समाजावरील दबाव कमी करण्यासाठी सर्वांनी एकमेकांचे स्वाभिमान बाजुला ठेऊन सोबत कार्य करण्यासाठी सहकार्य करावे.
आपल्या देशात सर्वात जास्त  महत्व स्मार्ट सिटीला का मिळत आहे.
स्मार्ट शिक्षण किंवा स्मार्ट शेतकरी यांना का नाही…?
हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आपल्या देशात स्मार्ट सिटीला महत्व नसुन स्मार्ट शिक्षण व स्मार्ट शेतकरी या दोन गोष्टीला जास्त प्राधान्य मिळेल अस मला वाटते.
ज्या देशात 70 ते 80 % सुशिक्षित मुल मुली आहे हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
त्या सुशिक्षित मुला मुलींना रोजगार कसे मिळेल त्या।कडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.तर शेतकर्यासाठी तर खुप महत्वाच्या बाबी लक्षाच घेउनच ठोस निर्णय घ्यावेत.
कारण काही दिवसा पूर्वी एक सर्वात मोठी व समाजातील सर्वात गरजेची बातमी वर्तमान पत्रात वाचायला मिळाली, ती म्हणजे बिड जिल्यातील 25 मुली व मुले या वर्षी लग्न करनार नाही. का तर त्यांचे वडील गरीब शेतकरी आहेत शेतीच्या ना पिकी मुळे हंगाम तोट्यात असल्या कारणाने गरीब शेतकरी कडे पैसा नाही त्या कारणाने त्यांचे लग्न होनार नाही.
जर सरकारने गरीब जनतेला जास्तीत जास्त मदत केली तर या देशात कोन्ही शेतकरी आत्महत्या करून आपल्या लहान लहान बालकांना उघड्यावर सोडनार नाही.त्यांना हमी भाव मिळालेच पाहिजे. त्याना त्यांचा राबायचा मोल मिळालाच पाहिजे. तर खरे देश स्मार्ट बनेल. डिझीटल देश बनविण्यासाठी देशातील जनता पहिली डिझीटल बनली पाहिजे तरच देशा स्मार्ट व डिझीटल बनेल.
हे सर्व विचार मनात न घेता आपण फक्त स्मार्ट सिटी च बनवत राहिलो तर गरीब शेतकरी एक एकाने पाठोपाठ आपली सहिष्णुता विसरून खरोखर आत्महत्या करत राहिल व आपल्या देशातील खरा दाता शेतकरी संपून जाईल.
या गोष्टीच मला खंत वाटते.
आणी या गरीब परिवारांना खरोखर शिक्षण मिळत राहिला तर गोर गरीबांच्या मुंलाचे स्वप्न खर्या अर्थाने पूर्ण होण्यासाठी कसलीच अडचन राहणार नाही. व देश खरो खर डिझीटल बनेल.
जो तो शिकेल ज्या त्या मार्गाने आपआपल्या विचाराने छोटी मोठी नौकरी करून आपल्या परिवारांची उद्दनिर्वाह भागवेल व समाजावरील दबाव कमी होईल.
जर स्मार्ट शिक्षण मिळनार नाही व स्मार्ट शेतकरी बननार नाही तर देश संपल्या शिवाय राहणार नाही.
आपल्या देशात शिक्षण या क्षेत्राला खुपच कमी महत्व आहे. या क्षेत्राला जास्तीत जास्त महत्व देणे गरजेचे आहे.समाजावरील मानसिकता कमी करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे,
“शिका संघटीत व्हा संघर्ष करा”
धन्यवाद…..

गोर कैलास डी.राठोड
सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई.
चिफ ऐडीटर बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,
www.banjaraone.com

image

Posted from WordPress for Android